Mumbai High Court: यंदाच्या वर्षात म्हण़जेच २०२४ या वर्षात ३६५ दिवसापैकी तब्बल १३२ दिवस मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज होणार नाहीये. न्यायालय प्रशासनाने नुकताच २०२४ वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. परंपरेचे पालन करत यंदाही न्यायालय प्रशासनाने सुट्ट्यांचा कालावधी जाहीर केला आहे. न्यायालयाच्या सर्व खंडपीठांत हे वेळापत्रक लागू असणार आहे
उच्च न्यायालय सर्वाधिक २३ दिवस मे महिन्यात बंद राहील. जून, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रत्येकी १४ दिवस कामकाज होणार नाहीये. सणानिमित्त १८ दिवस न्यायालयाची दारे बंद राहतील. याशिवाय ५२ रविवार तसेच प्रत्येक दुसरा आणि चौथा शनिवार असे २६ शनिवार सुट्टयांचा कालावधी असणार आहे.
ग्रीष्मकालीन ३० दिवस व दिवाळीनिमित्त १६ दिवस उच्च न्यायालयात सुनावणी होणार नाही. नाताळानिमित्त देखील १० दिवस कामकाज बंद असणार आहे. १३ मे ते ९ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टया जाहीर केल्या आहेत. दिवाळीच्या सुट्टया २८ ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत आहेत.
खंडपीठानुसारही काही विशेष दिवशी न्यायालयाला सुट्टी देण्यात आल्या आहेत. नागपूर खंडपीठात १० मे रोजी अक्षय तृतीया आणि ११ सप्टेंबर रोजी महालक्ष्मी पूजेनिमित्त सुट्टी राहील. पणजी खंडपीठात ६ सप्टेंबरला हरतालिका, ३ डिसेंबरला 'फीस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेव्हिअर' तसेच १९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिनानिमित्त सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.