Supriya Sule vs Chitra Wagh  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule vs Chitra Wagh : 'राज्याच्या मोठ्या ताई, सुप्रियाताई तुम्ही आता.....', चित्रा वाघ यांचे सणसणीत उत्तर

चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोंडीवरून राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपला लक्ष करतात, तर त्याला भाजपचे नेते प्रत्युत्तर देत असतात. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, "100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना आवडणार नाहीच" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.चित्रा वाघ यांनी यासंबधीचं ट्विट केलं आहे.

चित्रा वाघ यांनी नेमकं काय म्हटलं आहे ट्विटमध्ये?

राज्याच्या मोठ्ठ्या ताई…सुप्रियाताईंना ₹100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणार नाहीच. महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही, कारण...

ससून प्रकरणात 9 पोलिस निलंबित झाले, पण तुम्हाला ते आवडले नसेल कारण...हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या, पण तेही तुम्हाला आवडले नसेल कारण... कारण, तुम्हाला फक्त 100 कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यातून असो की वसुली करून देणारा गृहमंत्री..

तुम्हाला हवे काय ?

आरोपींना लोणावळ्यात सरकारी इतमामात पळून जायला मदत करणारा गृहमंत्री हवाय? की उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना सेवेत घेणारा गृहमंत्री? तुमची चॉईसच वेगळी आहे, त्याला महाराष्ट्र करणार तरी काय महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई?

सुप्रिया सुळेंची टीका काय होती?

अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यास मला आनंदच होईल, ते मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार त्यांना मी घालणार. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी यांनी ही संधी मला द्यावी असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. अजित पवारांनी राज्याच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रिपद देऊ नये, असंही पुढे त्या म्हणाल्या होत्या. त्याला आता चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

Mumbai Indians च्या संघाने नवीन प्रशिक्षक जाहीर केला; २०१० पासून संघासोबत असलेल्या खेळाडूला केले बाय बाय...

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT