महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : युवकांनी राजकारणात पुढं यावं : उद्धव ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून राजकारण पाहत आहे. ते पाहत-पाहत राजकारणात आलो आहे. त्यानंतर आता अशाचप्रकारे युवकांनीही राजकारणात यावे, अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) केली. तसेच दडपण नको म्हणून आदित्य ठाकरे यांच्यासोबत नव्हतो, असेही ते म्हणाले.

'मातोश्री' येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, वरळीतून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी देत असताना शिवसैनिकांनी त्यांना स्वीकारले आहे. त्याला कोणताही विरोध केला नाही. त्यामुळे मी सर्व शिवसैनिकांना धन्यवाद देतो. तसेच ज्यावेळी निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेनेने कोणाला विरोध केला नाही. आमची पिढी स्वप्न पाहत पुढे गेली. आताही युवकांनी पुढे येऊन राजकारण, महाराष्ट्र घडवला पाहिजे. 

8 तारखेला अधिक बोलणार

येत्या 8 तारखेला दसरा मेळाव्यात पुढील राजकीय गोष्टींवर भाष्य करणार आहे, असे म्हणत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. 

चंद्रकांत रघुवंशी यांचा शिवसेनेते प्रवेश

नंदूरबारमधील काँग्रेसचे विधान परिषद सदस्य असलेले चंद्रकांत रघुवंशी यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

14 व्या वर्षी लग्न, सासरी सहन केला नाहक त्रास, 450 सिनेमांमध्ये काम करुनही झाला दुर्देवी अंत, कोण होती अभिनेत्री?

Gulabjam City: जिभेवर ठेवताच विरघळणारा 'शाही' गोडवा! 'या' शहराला म्हणतात 'गुलाबजामची राजधानी'; ८५ वर्षांपासून जपलीये चव!

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT