zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ पुन्हा बदलणार! तापमानाचा पारा वाढला, 5 दिवसांपासून सोलापूरचे तापमान 40 अंशांवर, झेडापी सीईओ म्हणाले...

उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय झाला. १० मार्चपासून शाळा सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा या वेळेत भरत आहेत. मात्र, पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या काळातील तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक राहिले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय झाला. १० मार्चपासून शाळा सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा या वेळेत भरत आहेत. मात्र, पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या काळातील तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आता शाळा सुटण्याची वेळ कमी करण्याची तयारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दर्शविली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यानुसार शाळा सुटण्याची वेळ पावणेबारा किंवा बारा अशी होईल.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक काही दिवसांपूर्वी झाली, त्यात सोमवारपासून (ता. १०) शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप म्हणाले, आमच्या विभागाकडील शाळांची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी बारापर्यंत आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारापर्यंत आहे. त्यामागे विद्यार्थ्यांना अधिकाधिक अध्यापन व्हावे हा हेतू आहे, पण जिल्ह्यात दोन हजार ७७७ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एक लाख ९८ हजारांवर विद्यार्थी आहेत. त्यातील बरेच विद्यार्थी वाड्या-वस्त्यांवरून गावातील शाळेत येतात.

दुपारी साडेबारा वाजता शाळा सुटल्यावर त्यांना घरी जायला किमान १५ मिनिटे तरी लागतात. अनेक विद्यार्थी कौटुंबिक परिस्थितीमुळे अनवणी येतात. त्यामुळे शाळा सुटण्याची वेळ नेमकी उन्हाचा पारा वाढलेला असतो तेव्हाचीच आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा सुटण्याची वेळ कमी करावी, अशी मागणी पालकांसह शाळा व्यवस्थापन समित्यांची देखील आहे. त्यावर दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.

सात दिवसांतील तापमान

  • तारीख तापमान

  • १० मार्च ३७.६ अंश

  • ११ मार्च ३८.६ अंश

  • १२ मार्च ३९.४ अंश

  • १३ मार्च ४०.८ अंश

  • १४ मार्च ४१.१ अंश

  • १५ मार्च ४०.३ अंश

  • १६ मार्च ४०.४ अंश

वाढत्या तापमानामुळे उन्हात घराबाहेर पडू नका

मानवाच्या शरीराचे सरासरी तापमान ३८ अंशापर्यंत असते. प्रत्येक व्यक्तीचे ते प्रमाण वेगवेगळे असते. शरीरापेक्षा बाहेरी तापमान वाढल्यावर डी-हायड्रेशन होऊन (पाणी कमी होते) चक्कर येते, मळमळ होते. त्याचे प्रमाण जास्त झाले आणि संबंधितास वेळेत उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू देखील होतो. त्यामुळे वाढत्या तापमानात घराबाहेर पडणे टाळावे.

- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्याधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bawankule recalls Atalji's words : भाजपच्या घवघवीत यशानंतर बावनकुळेंनी अटलजींच्या 'त्या' वाक्याची करून दिली आठवण!

BCCI CENTRAL CONTRACT FOR 2025-26: रोहित शर्मा, विराट कोहली A+ मधून थेट B ग्रेडमध्ये; शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा अव्वल श्रेणीत

Zilla Parishad BJP Performance : राज्यात अव्वल ठरलेला भाजप 'या' जिल्हापरिषदेत मात्र थेट चौथ्या स्थानावर घसरला!

Maharashtra Politics: नगर परिषद, महानगरपालिका ते जिल्हा परिषद; भाजपची हॅटट्रिक, देवेंद्र–रविंद्र जोडी पुन्हा नंबर 1!

Video Viral: हा कसला 'देवदास'; तो तर रोज 'पारो' बदलतो! आशिष नेहराचे On Air हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT