dipali 
मनोरंजन

coronavirus: 'पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ' म्हणत १५ मराठी कलाकारांचा गाण्यातून नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न..

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई-  कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची सध्या संख्या कमी असली तरीदेखील हा आकडावाढतच चालला आहे, याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मनामध्ये नकारात्मकता वाढत आहे. याच धर्तीवर लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी अनेक कलावंतांनी एकत्र येऊन "पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ" हे नवं कोरं गाणं रसिकांसमोर आणलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण हे दोन्ही सर्व कलाकारांनी घरातून मोबाईलच्या साहाय्याने केले असून, तांत्रिक बाबींच्या साहाय्याने शक्य तितकं स्टुडिओ ध्वनिमुद्रणाच्या बरोबरीचं करण्याचा प्रयत्न केला आहे.

गाण्यात दीपाली सय्यद, मनोज जोशी, किशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, शिल्पा अनासपुरे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, शरद पोंक्षे, वर्षा उसगावकर, मानसी नाईक, गायत्री दातार, नितीश चव्हाण, स्मिता शेवाळे, देवदत्त नागे, किरण गायकवाड असे दिग्गज कलाकार एकत्र दिसत आहेत.

याप्रसंगी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या कि "कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, वाढत्या लॉकडाऊनमुळे, सतत घरात राहून नकारात्मकता वाढू शकते, या गाण्याच्या माध्यमातून लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा आम्हा सर्व कलावंतांचा प्रयत्न होता, लोकांना नक्कीच तो आवडेल अशी आम्हाला खात्री आहे". कलावंतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गाणे रसिकांसमोर आणले असून लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

गाण्याचं दिग्दर्शन व संकलन मकरंद शिंदे यांनी केले असून, संगीत जीवन मराठे यांनी दिलं आहे, गाण्याचे शब्द वैशाली मराठे, सुरेखा मराठे, शौनक कंकाल यांचे असून हे जीवन मराठे, कविता राम, राजेश्वरी पवार, क्रिशा चिटणीस यांनी गायलं आहे. तर पोस्टर अनिल शिंदे यांनी बनवलं आहे. गाण्याची संकल्पना अभिनेत्री दीपाली सय्यद यांची असून हे गाणं रसिकांसमोर आणण्यासाठी श्रीनिवास कुलकर्णी, अमोल घोडके, राजेंद्र अनासपुरे यांनी पुढाकार घेतला.

15 marathi celebrities come forword to remove coronavirus negativity by punha ekda garud bharari gheu song

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI MPC Updates: आरबीआयने सर्वसामान्यांना दिला मोठा धक्का; सणासुदीच्या काळात कर्जाचा EMI कमी होणार नाही

Video: पुण्यात गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात, नवले पूलाजवळ घडली घटना, रिक्षाला उडवलं

DMart कोणत्या सेक्शनमधून सर्वाधिक पैसे कमावतो? किराणा, कपडे की इतर...

Smart Goggle: दृष्टिहीनांचे जगणे होणार सुसह्य; पांढऱ्या काठीच्या जागी आता स्मार्ट गॉगल

INDU19 vs AUSU19 : १७ चेंडूंत ८४ धावा ! वैभव सूर्यवंशीचे ऑस्ट्रेलियात कसोटीत वेगवान शतक; ब्रेंडन मॅक्युलमच्या विक्रमाशी बरोबरी

SCROLL FOR NEXT