Rishi Kapoor Sakal
मनोरंजन

Rishi Kapoor: 'प्रत्येक चांगल्या आठवणीत...', ऋषी कपूर यांच्या स्मृतीदिनानिमित्त नीतू कपूर भावुक, पोस्ट व्हायरल

ऋषी कपूर यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे. यावेळी नीतू कपूरने कधीही न पाहिलेले फोटो शेअर करताना ऋषींची आठवण काढली.

Aishwarya Musale

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांची आज पुण्यतिथी आहे. ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केले होते. जे त्यांच्या मृत्यूनंतरही कायम आहे. त्याच्या कुटुंबासह त्यांचे चाहते त्यांना कधीच विसरू शकत नाहीत. आज ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी कधीही न पाहिलेले फोटो शेअर करून त्यांची आठवण काढली आहे.

तीन वर्षांपूर्वी याच दिवशी ऋषी कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला होता. या दुःखद बातमीने त्यांचे कुटुंब, त्यांचे चाहते तसेच त्यांना ओळखणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झाले.

ऋषी यांच्या निधनाची बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. आता आज, 30 एप्रिल रोजी, ऋषींच्या पुण्यतिथीनिमित्त, नीतू कपूरने एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'प्रत्येक वेळी प्रत्येक चांगल्या आठवणीत तुझी आठवण येते.'

ऋषी आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरने तिच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. जी नीतू कपूरने तिच्या स्टेटसमध्ये रिशेअर केली आहे. या आनंदी कौटुंबिक फोटोमध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूरसोबत रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर आणि तिची मुलगी समरा साहनीही दिसत आहेत.

Rishi Kapoor

बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हणून ओळखले जाणारे ऋषी कपूर यांनी ५० वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास १२१ चित्रपट केले होते. जरी ते खूप आनंदी व्यक्ती होते, परंतु ते दीर्घकाळ कर्करोगाशी लढा देत होते.

दरम्यान, 30 एप्रिल रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. लॉकडाऊनमुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त 20-25 लोकच उपस्थित राहू शकले. शर्माजी नमकीन हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saina Nehwal: भारताची फुलराणी निवृत्त! म्हणाली, '...तेव्हा खेळणं थांबवायलाच हवं'

Water Bottle Cap Color : पाण्याच्या बाटलीचे झाकण वेगवेगळ्या रंगांचे का असतात? कोणत्या बाटलीत असतं जास्त शुद्ध पाणी..'कलर कोड'चं सत्य पाहा

स्टेजवर सर्वांसमोर चाहता घेत होता सेल्फी, शाहरुख खाननं हातातून फोन घेत केलं असं काही की... Viral Video

IND vs NZ 1st T20I : हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन; दोन वर्षांनंतर तगडा खेळाडू परतणार, भारताची संभाव्य Playing XI

Charcoal Peel Mask: चमकदार त्वचेसाठी 'चारकोल पील मास्क' वापरणे योग्य की अयोग्य? वाचा त्वचारोगतज्ज्ञ काय सांगतात

SCROLL FOR NEXT