48-year-old Tamil actress Charmila makes shocking revelation, Google
मनोरंजन

अभिनेत्रीनं केला निर्मात्याचा पर्दाफाश, म्हणाली,'आधी दीदी बोलला,नंतर मला..'

साऊथ अभिनेत्री चार्मिलानं नुकत्याच एका मुलाखतीत एका २४ वर्षीय निर्मात्याचा पर्दाफाश केला आहे.

प्रणाली मोरे

सिनेमा आणि ग्लॅमर इंडस्ट्रीतून नेहमीच कास्टिंग काउचच्या बातम्या समोर येत असतात. कितीतरी अभिनेते आणि अभिनेत्रींना या कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. आणि त्यानंतर अनेकांनी समोर येऊन शॉकिंग खुलासे देखील केले आहेत. आता साऊथ सिनेमाची अभिनेत्री चार्मिलानं (Charmila) कास्टिंग काउच (Casting Couch) संदर्भात एक शॉकिंग खुलासा केला आहे.४८ वर्षीय चार्मिलाने सांगितलं आहे की,''ज्या निर्मात्यासोबत ती एक सिनेमा करत होती,तो तिला पहिल्यांदा तर मोठी बहिण मानून दीदी संबोधत होता. आणि नंतर त्यानं ५० हजार रुपये देईन, माझी शारिरीक भूक भागव असं थेट अर्वाच्य भाषेत मागणी केली''.(48-year-old Tamil actress Charmila makes shocking revelation)

चार्मिलाने एका मुलाखतीत कास्टिंग काउटचा अनुभव शेअर केला आहे. चार्मिलानं सांगितलं आहे की, तिनं नुकतंच एका सिनेमाचं शूटिंग केलं,ज्यात ती आईची भूमिका साकारत होती. तो एक मल्याळम सिनेमा होता. या सिनेमाचं शूचिंग कालीकटमध्ये झालं. या सिनेमाचा निर्माता खूपच तरुण होता,अगदी २४-२५ वर्षांचा. चार्मिलाच्या म्हणण्याप्रमाणे,सुरुवातीला तो निर्माता तिला दीदी म्हणायचा,मोठ्या बहिणीसारखं वागवायचा पण शूटिंगच्या तीन दिवसानंतर त्या निर्मात्यानं त्याच्या असिस्टंटच्या माध्यमातून संपर्क साधला आणि ५० हजार रुपयांच्या बदल्यात सेक्सची डिमांड केली. सुरुवातीला चार्मीला मोठा धक्का बसला. तिला सुचलं नाही की ती काय करतेय. तिनं निर्मात्याला समजावलं की,तो तिच्या मुलाच्या वयापेक्षा काही वर्षांनी मोठा आहे. पण निर्मात्यानं तिचं काहीच ऐकलं नाही. तेव्हा चार्मिला तिथून तडक निघाली आणि फ्लाइट पकडून चेन्नईला परत निघून गेली.

चार्मिला एक सिंगल मदर आहे. १९९५ साली तिनं अभिनेता किशोर सत्यासोबत लग्न केलं होतं. पण ४ वर्षानंतर ते विभक्त झाले. २००६ मध्ये चार्मिलानं एका इंजिनिअरसोबत लग्न केलं पण ते देखील लग्न २०१४ साली तुटलं. या लग्नापासून चार्मिलाला एक मुलगा आहे.

चार्मिलाच्या सिनेकरिअर विषयी बोलायचं झालं तर १९७९ मध्ये बालकलाकार म्हणून तामिळ सिनेमा Nallathoru Kudumbam मधनं अभिनयाची सुरुवात केली. तिने तामिळ,तेलुगु,मल्याळम भाषांतील सिनेमातून काम केलं आहे. कास्टिंग काउच संदर्भात बोलायचं झालं तर चार्मिलाच्या आधी साउथ फिल्म इंडस्ट्रीतील कितीतरी नव्या अभिनेत्रींनी याविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. अनुष्का शेट्टीपासून रकुलप्रीत सिंग,अदा शर्मा,ऐश्वर्या राजेश आणि सिद्धि इदनानी यांची नावं देखील यात सामिल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स

Pune Traffic : पुणे शहरात येणाऱ्या मार्गांवर दुतर्फा कोंडी; सध्यांकाळी रांगा वाढल्या

SCROLL FOR NEXT