चावला Juhi Chawala
मनोरंजन

5G Network : जुही चावलाच्या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिने पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिने पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 5G वायरलेस नेटवर्कमधून (5G Network) मानव, प्राणी आणि वनस्पतींवर होणाऱ्या रेडिएशनच्या (Radiation) दुष्परिणामांचा दावा तिने केला आहे. जुही चावलाची याचिका फेटाळून लावत २० लाखांचा दंड सिंगल बेंचच्या न्यायालयाने दिला होता. सिंगल बेंचच्या निर्णयाला दुहेरी खंडपीठात तिने आव्हान दिले आहे. जुहीच्या याचिकेवर गुरुवारी (ता. २३) दुहेरी खंडपीठासमोर सुनावणी (Hearing in the High Court) होणार आहे.

जुही चावला (Juhi Chawla), वीरेश मलिक आणि टीना वाचानी यांनी याचिका दाखल केली होती की, टेलिकॉम इंडस्ट्रीची 5G योजना (5G Network) पूर्ण झाली तर पृथ्वीवरील कोणताही माणूस, प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पती याच्या दुष्परिणामांपासून (Side effects) वाचणार नाही. जूनमध्ये हायकोर्टाने जुहीची याचिका फेटाळून लावताना शेरेबाजीही केली होती. न्यायालयाने या याचिकेला पब्लिसिटी स्टंट म्हटले होते.

याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केला आहे. ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आल्याचे दिसते, असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते. न्यायालयाने थेट जुहीवर (Juhi Chawla) याचिका दाखल करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. हायकोर्टाने म्हटले होते की, तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या चिंतेबाबत सरकारने आधी अर्ज करायला हवा होता. न्यायमूर्ती जेआर मिधा यांनी जुही चावलाच्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयाने म्हटले होते की चावला आणि इतर दोघांनी प्रथम त्यांच्या हक्कांसाठी सरकारकडे जाणे आवश्यक आहे आणि जर नकार मिळत असेल तर त्यांनी न्यायालयात यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Player Heart Attack Video : क्रिकेट खेळताना मैदानावरच खेळाडूला हृदयविकारचा तीव्र झटका; जागीच कोसळून मृत्यू

Property Tax : विरोधामुळे मिळकतकर वाढीचा निर्णय लांबणीवर; स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव पुढे ढकलला

Pali News : पशुपालकांना मोठा दिलासा! वीज बिलाच्या टेन्शनमधून सुटका; आता 'कृषी' दराने मिळणार वीज

Police Recruitment : मोठी बातमी! पोलिस भरतीला १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ; १६३३ जागांसाठी तब्बल १.३९ लाख अर्ज

Latest Marathi News Live Update : पुण्यामध्ये लष्करी अभियांत्रिकी सेवेच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT