Vivek Agnihotri New Series Esakal
मनोरंजन

69th National Film Awards: 'कश्मीर फाईल्स'ची बाजी; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीनं कोणाला केला पुरस्कार अर्पण? जाणून घ्या

६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी नवी दिल्लीत घोषणा करण्यात आली. यावर विवेक अग्निहोत्रींनी प्रतिक्रिया दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

69th National Film Awards: ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटानं दोन पुरस्कार पटकावले आहेत. पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कळताच या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आनंद व्यक्त केल आहे. तसेच हा पुरस्कार त्यांनी काश्मीरमधील दहशतवादाच्या पीडिताना अर्पण केला आहे. (69th National Film Awards The Kashmir Files wins Vivek Agnihotri dedicate it to people of Kashmir)

हा माझा चित्रपट नाही

'द काश्मीर फाईल्स'नं उत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मता 'नर्गिस दत्त' चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पल्लवी जोशी यांनी पुरस्कार जिंकला आहे. यानंतर अग्निहोत्री यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, "मी सध्या अमेरिकेत आहे आणि मला इथं सकाळी सकाळी बातमी मिळाली की, काश्मिर फाईल्सला भारताचा ६९वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार भारताचा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. (Entertainment News in Marathi)

मी कायमच सांगत आलो आहे की, 'कश्मीर फाईल्स' हा माझा चित्रपट नाही. काश्मीरमध्ये दहशतवादाचे बळी गेलेले हिंदू, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, दलित, गुज्जर आहेत हा चित्रपट त्यांचा आवाज आहे, मी तर यासाठी माध्यम होतो. हा आवाज संपूर्ण जगात पोहोचला आहे.

दिवसरात्र आम्ही मेहनत करुन या चित्रपटाला जगभरात पोहोचवलं आणि आता या राष्ट्रीय पुरस्कारानं त्यावर मोहोर उमटली आहे. हा पुरस्कार मी आमच्या निर्मिती कंपनीकडून त्या सर्व पीडितांना अर्पण करतो जे दहशतवादाचे पीडित आहेत खासकरुन काश्मिरी हिंदू. तसेच जगभरात कोणताही भारतीय दहशतवादाचा पीडित असेल हा चित्रपट त्यांचा आवाज आहे, त्यांचं दुःख आहे, असंही पुढे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

पुरस्कारांवर कोणी मारली बाजी?

  1. सर्वोत्कृष्ट चित्रपट - 'रॉकेट्री : द नांबी इफेक्ट'

  2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल महाजन (गोदावरी)

  3. सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा - एकदा काय झालं

  4. सर्वोत्कृष्ट अभिनेता - अल्लू अर्जून (पुष्पा)

  5. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मीमी)

  6. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)

  7. सर्वोत्कृष्ट गायिका - श्रेया घोषाल

  8. सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा - सरदार उधम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT