Tunisha Sharma Esakal
मनोरंजन

Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी प्रियकर शीजान खानविरोधात गुन्हा दाखल

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेऊन काल आत्महत्या केली

सकाळ डिजिटल टीम

अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये मुख्य भूमिका निभावलेली टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेऊन काल आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी तुनिशाचा को स्टार अभिनेता शीजान खान याच्याविरोधात वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तुनिशाची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून शीजान खानविरोधात रात्री उशिरा भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शीजान खानला रात्री उशिरा अटक केली असून त्याची कसून चौकशी पोलीस करत आहेत.

वनिता शर्मा यांच्या तक्रारीनंतर शीजान खानला पोलिसांनी रात्री अटक केली. त्यानंतर मध्यरात्री त्याची वैद्यकिय चाचणी केली. नंतर त्याला वालीव पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आलं. सोनी सब चॅनेरवर सुरू असणाऱ्या अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेत तुनिशा आणि शीजान खान दोघेही मुख्य भूमिकेत होते. या दोघांचे प्रेम संबंध असून त्यानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तुनिशाच्या आईने दिल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर तुनिशाने बाबा: दास्तान-ए-काबुल सीरियलच्या सेटवर ज्या मेकअप रुममध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. ती रूम शीजानची आहे. शुटिंग संपवून परत आलो. मेकअप रुमचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून आत शिरलो. त्यावेळी तुनिशाने आत्महत्या केली होती असं शीजानने सांगितलं होतं. तर शीजानला आज वसई कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तुनिशा आणि शीजान दोघेही रिलेशनमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच दोघंच ब्रेकअप झालं होतं. यामुळे तुनिशा मानसिक तणावाखाली होती. त्यातूनच तिने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT