marathi celebs 
मनोरंजन

आदेश बांदेकर ते भरत जाधव.. मराठी कलाकारांनी घेतला लशीचा पहिला डोस

स्वाती वेमूल

कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असल्याने लसीकरण मोहिमेस गती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अनेक कलाकारांनी कोरोना प्रतिबंधक लस घेत चाहत्यांनाही आवाहन केलं आहे. मराठीतील कोणकोणत्या कलाकारांनी आतापर्यंत लस घेतली, ते पाहुयात

आदेश बांदेकर
'होम मिनिस्टर' फेम आदेश बांदेकर यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली. 

किशोरी शहाणे
मुंबई महानगरपालिकेचे आभार मानत अभिनेत्री किशोरी शहाणे यांनीसुद्धा लस घेतानाचा फोटो पोस्ट केला. 

सुबोध भावे
मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावेनं पत्नीसह लशीचा पहिला डोस घेतला. 'लस घेतली तरी काळजी घ्यायचीच आहे', असं लिहित त्याने चाहत्यांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं. 

हर्षदा खानविलकर
'रंग माझा वेगळा' मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनीसुद्धा लशीचा पहिला डोस घेतला. त्यासोबत चाहत्यांनाही योग्य ते नियम पाळण्याचं आवाहन केलं. 

भरत जाधव
'सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही सरकारी नियमाप्रमाणे कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकर करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा', अशी पोस्ट लिहित भरत जाधवने फोटो पोस्ट केला. काही दिवसांपूर्वीच त्याने लशीचा पहिला डोस घेतला. 

रेशम टिपणीस
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री रेशम टिपणीसने कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Election Symbol: कॉकरोच जनता पार्टीला ‘कॉकरोच’ निवडणूक चिन्ह का मिळू शकत नाही? आयोगाचा नेमका नियम काय? जाणून घ्या...

Junnar Hailstorm : जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस-गारपीट; डाळिंब, आंबा, टोमॅटो व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवड शहरात जोरदार अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा करणाऱ्या डीपीमध्ये मोठा ब्लास्ट

MRP Profiteering Control: एमआरपीतील नफेखोरी रोखा; स्वतंत्र कायदा व प्राधिकरणाची अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी

Vijay Shankar Retires : 'मला प्रचंड द्वेष आणि नकारात्मकतेचाही सामना करावा लागला'; भारताच्या '3D' खेळाडूची तडखाफडकी निवृत्ती

SCROLL FOR NEXT