Madhurani gokhale Prabhulkar  
मनोरंजन

'अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय'; मधुराणी गोखले प्रभुलकरची भावनिक पोस्ट

मधुराणी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ Aai Kuthe Kay Karte मालिकेतलं भावनिक वळण सध्या प्रत्येकाच्याच मनाला चुटपुट लावणारं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा २५ वर्षांचा संसार अखेरिस मोडला. घटस्फोटानंतर अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं. अरुंधतीला घर आणि आपली माणसं सोडताना ज्या वेदना झाल्या त्याच वेदना अनुभवताना प्रेक्षकांनाही अश्रू अनावर होत होते. अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर Madhurani gokhale Prabhulkar यांनी देखील एक भावनिक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

या पोस्टमध्ये मधुराणी म्हणाल्या, ‘२५ वर्षं जो संसार इतका जीव जडवून केला, तो डोळ्यासमोर उन्मळून पडताना पाहणं, जी माणसं जीवापाड जपली त्यांना सोडून जाणं, आपलं आत्तापर्यंतचं अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकून, नव्याने सुरुवात करणं हे अरुंधतीच्या आयुष्यात आलेलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. किती वेदनेतून जात असेल ती. हे गेले सर्व एपिसोड आम्ही सगळेच अरुंधतीची ही वेदना अक्षरशः जगलोय आणि ह्या सगळ्याला आपण प्रेक्षकांनी सुद्धा इतका मायाळू प्रतिसाद दिलात की आम्ही भारावून गेलोय. असंख्य फोन आणि मेसेजेस मधून जाणवतं की अरुंधती मध्ये सगळे किती गुंतलेत. पुन्हा पुन्हा ही अशी भूमिका करायला मिळाल्याबद्दल परमेश्वर आणि रंगदेवतेचे आभार मानावेसे वाटतात. स्टार प्रवाह वाहिनी, निर्माते राजन शाही, लेखिका नमिता वर्तक आणि मुग्धा गोडबोले, दिग्दर्शक रवींद्र करमरकर आणि सर्व सहकलाकारांच्या मी कायम ऋणात असेन.'

या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. यातील प्रत्येक भूमिकेने दमदार कामगिरी केली असून टीआरपीच्या यादीतही ही मालिका अग्रस्थानी असते. आई कुठे काय करते ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT