Aai Kuthe Kay Karte 
मनोरंजन

आई कुठे काय करते: 'अरुंधती'ने मालिकेतून घेतला ब्रेक

नेमकं काय आहे कारण?

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. तर अनेक पुरस्कारही या मालिकेने आपल्या नावे केले आहेत. यामध्ये अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांची प्रचंड लोकप्रियता आहे. सोशल मीडियावर त्या नेहमीच सक्रिय असतात. मालिकेविषयी आणि पडद्यामागे घडणाऱ्या गमतीजमतीविषयी त्या पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी या मालिकेतून ब्रेक घेतल्याची माहिती समोर येत आहे.

मालिकेत गेल्या दोन-तीन भागांमध्ये प्रेक्षकांना अरुंधती पहायला मिळाली नाही. त्यामुळे नेमकं काय झालं, ती कुठे गेली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यामागचं कारण आता समोर आलं आहे. अरुंधती साकारणाऱ्या मधुराणी यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी काही दिवस सुट्टी घेतली आहे. त्यामुळेच मालिकेत त्या गैरहजर आहेत.

मधुराणी या लवकरात लवकर बरे होऊन मालिकेत परत यावं, असं चाहत्यांनी म्हटलंय. मालिकेत मधुराणी यांच्यासोबतच मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले यांच्याही मुख्य भूमिका आहेत. नुकताच मालिकेत अनघा-अभिषेकच्या लग्नाचा थाट पहायला मिळाला. या लग्नाच्या शूटिंगदरम्यान सेटवर कलाकारांनी खूप धमाल केली. त्याचे किस्से, व्हिडीओ, फोटो या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT