Madhurani Prabhulkar as 'Arundhati'-Aai Kuthe Kay Karte Instagram
मनोरंजन

'आई कुठे काय करते' मधील 'अरुंधती' बदलणार;सोशल मीडियावर चर्चा

नुकत्याच प्रसारीत करण्यात आलेल्या मालिकेच्या प्रोमोमुळे अखेर कळालं खरं कारण

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावर जेव्हा एखादी मालिका प्रसारीत होते तेव्हा काही दिवस तिच्यात प्राण असतो,ती लोकांचं मनोरंजनही करते पण पुढे कालांतराने मात्र तिचा दर्जा हा घसरत जातो. हे साधारण गणित ठरलेलंच. एका क्षणाला तर प्रेक्षकही म्हणतात की आता बंद करा मालिका. पण स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay karte) मालिकेनं मात्र हे सर्व अंदाज चुकीचे ठरवले आहेत. मालिका जेव्हापासून सुरू झालीय तेव्हापासून ते आजपर्यंत मालिकेनं केवळ प्रत्येक एपिसोडगणिक लोकांची उत्कंठा वाढवल्याचं दिसून आलं आहे. या मालिकेत ना कुठे उगाचचा आरडाओरडा पहायला मिळतो,न नेहमीच्या दागदागिने घालून स्वयंपाक घरात काम करणाऱ्या नायिका इथे दिसतात ना खलनायकी डावपेच इथे रंगतात. या मालिकेनं या सगळ्यापासून दूर राहून अगदी साध्यासरळ भाषेत लोकांचं मनोरंजन करीत नंबर वन पद कायम राखलंय. या मालिकेच्या कथानकासोबतच यातील अगदी प्रत्येक व्यक्तिरेखेसोबत घराघरातील माणूस जोडला गेला आहे.

या मालिकेतील अरुंधती(Arundhati) या व्यक्तिरेखेसाठी कधी प्रेक्षक भावूक होतो तर कधी तिच्या यशावर खूश होतो. इतकी ती आपली वाटू लागली आहे. अर्थात अरुंधती साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरला(Madhurani Prabhulkar) प्रेक्षकांनी कधीच आपलं मानलं आहे. पण आता बातमी येतेय की अरुंधती बदलणार...म्हणजे नेमकं काय काही कळत नाही आहे.त्यात मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा होऊ लागली आहे. चला जाणून घेऊया सविस्तर .तर सर्वप्रथम तर आम्ही तुमची ही चिंता दूर करतो ती म्हणजे,अरुंधती बदलणार असं जे आम्ही म्हटलंय ते तिच्या लूकसंदर्भात म्हटलं गेलं आहे. नेहमीच एक सरळ घट्ट वेणी बांधलेली,चापूनचोपून साडी नेसलेली अरुंधती आता चुडीदार घालताना दिसणार आहे. तिच्या लूकमध्ये होणारा हा एक मोठा बदल म्हटला जात आहे. सध्या जो प्रोमो व्हायरल होत आहे त्यात अरुंधती चूडीदार घातलेली दिसत आहे. आणि काही दिवस आधी मालिकेतील तिच्या मुलांनी,नणंदेनं,सुनेनंही तिला यासंदर्भात जबरदस्ती केलीच होती की. आणि आता तिला एवढं बदललेलं दाखवलं आहे तर हा आणखी एक नवीन बदल केला तर बिघडलं कुठे. अर्थात या लूकमध्येही ती ग्रेसफुल दिसत आहे. तेव्हा पुढे जाऊन अरुंधती चांगले चांगले चूडीदार ड्रेस घालू लागली तर प्रेक्षकांनाही थोडं नवं पाहण्याचा अनुभव नक्कीच मिळेल. सोशल मीडियावर तर अरुंधतीच्या या नव्या लूकला घेऊन मोठी उत्सुकता पहायला मिळत आहे.

आता तसंही तिच्या आयुष्यात तिचा जुना मित्र आशुतोष आला आहे. तो तिला यश मिळावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ती देखी आता गायिका होण्याच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. त्यामुळे थोडा मेकओव्हर तर हवाच. पण यामुळे मालिकेत मात्र चांगलेच वाद रंगलेले एपिसोड पहायला मिळतील. तिच्या या बदललेल्या लूक वर तिची सासू आणि पु्र्वाश्रमीचा नवरा जो आजही तिच्यावर हक्क गाजवतोय त्या अनिरुद्धची नेमकी काय रीअॅक्शन असणार हे पाहणं रंजक असेल. काहीही असो,मालिकेतला अरुंधतीचा हा बदल तिच्यासोबतच प्रेक्षकांनाही आनंद देणारा ठरेल एवढं मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT