Aai Kuhe Kay Karte -Marathi Serial Google
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: 'मैत्रिणींनो जाग्या व्हा,नाहीतर मग..',अक्षता पडताच अरुंधतीचा महिला वर्गाला मोलाचा सल्ला

सोशल मीडियावर अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरनं समस्त महिला वर्गाला व्हिडीओच्या माध्यमातून लग्नात सावध राहण्याचा दिलेला इशारा तुफान व्हायरल होतोय.

प्रणाली मोरे

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेत अखेर आशुतोष आणि अरुंधतीचा लग्नसोहळा पार पडला म्हणायचा. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नावरनं देशमुखांच्या घरात तुंबळ युद्ध रंगलेलं पहायला मिळालं.

अनिरुद्ध देशमुखच्या कारस्थानांनी आणि तिखट बोलण्यानं तर पार हद्दच ओलांडलेली पहायला मिळाली. यामुळे अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळीला तर लोकांनी खूपच खरीखोटी सुनावली.

काहीवेळेला मालिकेत चाललेल्या घडामोडींचा तोचतोच पाढा पाहून प्रेक्षक कंटाळलेलेही दिसले. अरुंधतीनं कुणालाही न जुमानता अखेर जे वाटतं ते करून दाखवलं अन् आशुतोषशी लग्नाचा निर्णय मार्गी लावला एकदाचा.

सध्या सोशल मीडियावर अरुंधती-आशुतोषच्या लग्नाच्या व्हिडीओंचा नुसता सुळसुळाट सुरू आहे. अन् हे व्हिडीओ जोरदार ट्रेन्डिंगही आहेत. अशाच एका डिजिटल वाहिनीनं लग्नानिमित्तानं केलेल्या मुलाखतीत अरुंधतीनं समस्त महिला वर्गाला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

'आयुष्यात नाही म्हणायला शिका...तर सुखी व्हाल' यासंदर्भात बोलताना अरुंधती खूप काही बोलून गेली जे नेटकऱ्यांच्या मनालाही स्पर्शून गेलं आहे. (Aai Kuthe Kay Karte arundhati madhurani prabhulkar wedding video viral)

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या सेटवर सध्या अरुंधती-आशुतोषच्या लग्नाची धूम सुरु आहे. यानिमित्तानं नव्या नवरीनं म्हणजे आपल्या अरुंधतीनं समस्त महिला वर्गाला सल्ला दिला आहे.

ती म्हणाली, ''झोकून देऊन प्रेम करणं वेगळं आणि प्रेमात स्वतःला हरवणं वेगळं..अरुंधतीनं इतकी वर्ष अनिरुद्धच्या प्रेमात स्वतःला हरवलं आणि मग तिला कठीण गेलं स्वतःचं अस्तित्व शोधणं. तिला काय आवडतं. तिला काय वाटतं. मी कोण आहे. मी किती सहनशील असू शकते. मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की, मैत्रिणींनो,जाग्या व्हा..ठामपणे आपली मतं मांडायला शिका...जे आवडत नाही त्याला नाही म्हणायला शिका. तरच आयुष्याचा प्रवास सुखकर होईल. नाहीतर काहीही होणार नाही''.

अरुंधतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्यासोूबत अनिरुद्धची भूमिका साकारणारा मिलिंद गवळी देखील आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स आल्या आहेत. आणि अरुंधतीनं जे समस्त महिला वर्गाला उद्देशून म्हटलं आहे त्याचं समर्थन करणाऱ्यांमध्ये फक्त महिलाच नाहीत तर पुरुषही आहेत बरं का.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT