Aai Kuthe Kay Karte 
मनोरंजन

'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्री साऊथ सुपरस्टारसोबत करणार काम

अभिनेत्रीला मिळाला मोठा ब्रेक

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने विशेष छाप सोडली. म्हणूनच सोशल मीडियावरही या कलाकारांचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतोय. या मालिकेतील एका अभिनेत्रीला मोठी संधी मिळाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) काम करण्याची संधी या अभिनेत्रीला आहे. ही अभिनेत्री आहे मालिकेत विशाखाची भूमिका साकारणारी पूनम चांदोरकर (Poonam Chandorkar). पूनमने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली.

पूनमने तमिळ स्टार विजय सेतुपतीसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 'तुमची सद्सद्विवेक बुद्धी तुम्हाला सांगत असेल की ते शक्य नाही, पण असं घडलंय! तमिळ स्टार विजय सेतुपतीसोबत काम करणं हा एक सुखद धक्का आहे. हे सर्व तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांमुळे शक्य झालं,' असं तिने या फोटोसोबत लिहिलं आहे.

पूनम नक्की कोणत्या चित्रपटात काम करणार आहे आणि त्यात तिची काय भूमिका असेल याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT