Maharashtra Shaheer, Maharashtra Shaheer news, gau nako kisna, baharla ha madhumas, ankush chaudhari, kedar shinde, ashvini mahangade, Maharashtra Shaheer songs SAKAL
मनोरंजन

Maharashtra Shaheer: ज्यांच्या दिग्दर्शनात वडिलांनी नाटक केलं.. आज त्यांच्याच चित्रपटात मी.. अश्विनीची भावूक पोस्ट

महाराष्ट्र शाहीर सिनेमा २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

Devendra Jadhav

Ashvini Mahangade Special Post For Kedar Shinde News: केदार शिंदेंच्या लवकरच रिलीज होणाऱ्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे. अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत सिनेमात झळकणार आहे.

महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित अवघ्या काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

नुकताच महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. महाराष्ट्र शाहीर सिनेमात आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे सुद्धा झळकणार आहे.

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

अश्विनीने केदार शिंदेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी कि केदार शिंदेंच्या मालिकेसाठी अश्विनीने ऑडिशन दिली होती.

पण त्या मालिकेसाठी अश्विनीची निवड झाली नाही. आणि आता थेट केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमासाठी अश्विनीची वर्णी लागली आहे. याशिवाय अश्विनीच्या वडीलांनी केदार शिंदेंसोबत काम केलं होतं. अश्विनीने हा संपूर्ण किस्सा तिच्या सोशल मीडियावर शेयर केलाय.

अश्विनीने केदार शिंदेंसोबतचा फोटो शेयर करून लिहिलंय कि.. केदार सरांनी "वाई युवक केंद्र, वाई" मधून '"बॉम्ब - ए - मेरी जान" ' हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी दिग्दर्शित केलेले.

ज्यात प्रदीपकुमार महांगडे म्हणजे माझे वडील नाना, युनूस काका पिंजारी, मुनीर काका बागवान या सर्वांनी अगदी उत्तम कामे केली होती.

अश्विनी पुढे लिहिते.. लहानपणापासून "केदार शिंदे" हे नाव ऐकत होते. कधीतरी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी हे वाटणे स्वाभाविक आहे.

तशी वेळ आली जेव्हा "सुखी माणसाचा सदरा" या मालिकेसाठी ऑडिशन दिले. पण तेव्हा माझे casting झालेच नाही. आणि मी जरा निराशच झाले.

"महाराष्ट्र शाहीर " मुळे केदार सरांसोबत काम करता आले, शिकता आले. त्यांच्यात सकारात्मकता तुफान आहे. या चित्रपटाच्या शूट दरम्यान जे शिकता आले, अनुभवता आले ते सगळे अप्रतिम अनुभव आहेत.

शेवटी केदार शिंदेंच्या कामाच्या पद्धतीविषयी अश्विनी लिहिते.. पूर्ण युनिट हाताळणे, त्यांचा बाप होवून प्रेमाने आणि प्रसंगी थोडे कठोर बोलून काम उत्तम करून घेणे हे तसे अवघड.

काम उत्तम व्हावे यासाठीची तगमग, जबाबदारी पार पाडणे हेही अवघड. पण आम्हाला सोप्पे करून ते जग दाखवले त्यासाठी मी केदार सरांची ऋणी आहे आणि राहीन.

अशा शब्दात अश्विनीने केदार शिंदेंविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.. महाराष्ट्र शाहीर सिनेमा २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT