Aai Kuthe Kay Karte 
मनोरंजन

'आता निघायची वेळ झाली'; 'अरुंधती'ची भावनिक पोस्ट

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केला सेटवरचा व्हिडीओ

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत गेल्या काही दिवसांत लगीनघाई पहायला मिळाली. बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा मालिकेत पार पडला. या संपूर्ण लग्नसोहळ्याच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'घरात नवीन सून आली, आता अरुंधतीचीही निघायची वेळ झाली इथून..' असं लिहित त्यांनी सेटवरील घडामोडींचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मधुराणी यांची पोस्ट-

'देशमुखांचं घर गेले महिनाभर अगदी गजबजून गेलेलं. केळवणापासून सुरू झाली ही धामधूम, मग संगीत, मेहेंदी, हळद, लग्न, गृहप्रवेश काही विचारू नका... सगळे आपले रोज नटून थटून तयार! फारच मजेत गेला हा महिना. पाहुण्यासारखी कधीतरी सेटवर येणारी आमची सारी जिवलग मंडळीसुद्धा रोज भेटत होती. मग काय गप्पा, किस्से, चहा खारी आणि हशा आणि टाळ्या... खरोखरंच लग्नघर हो! या मूडमध्ये सगळे असताना आमच्याकडून काम करून घ्यायला आमचे दिग्दर्शक रवी करमरकर आणि असोसिएट सुबोध बारे यांना त्रासच पडला असणार. पण ते ही मुरलेले, आम्हाला वळणावर कसं आणायचं त्यांना चांगलं माहित आणि तसे आम्ही सगळे थोडेफार प्रामाणिक वगैरे म्हणून हे कार्य पार पडलं हो. आम्हाला सगळ्यांनाच माणसांची ये-जा आवडतेच. भरलेलं घर अजून भरलेलं किती छान वाटतं हो. पण आता सूप वाजणार, मांडव परतणी होणार, घरात नवीन सून आली. आता अरुंधतीचीही निघायची वेळ झाली इथून.. कसं करमणार?,' अशा शब्दांत मधुराणी यांनी शूटिंगचं वर्णन केलं.

मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. मालिकेतील भूमिकेविषयी त्या अनेकदा आपलं मत मांडत असतात, तर कधी सेटवरील अनुभव सांगतात. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

Suspicious Truck Driver Death: ठाणाजवळ ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू; गळफास, जखमा व रक्ताचे डाग पाहता घातपाताची शक्यता

Pune Bakri Eid : बकरी ईदसाठी पुण्यात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; संवेदनशील भागात कडक सुरक्षा व्यवस्था

SCROLL FOR NEXT