aai kuthe kay karte fame milind gawali special post for his father birthday  SAKAL
मनोरंजन

Milind Gawali: "पोलिसात असताना खंडेलवाल कंपनीची एक केस...", मिलिंद गवळींनी सांगितला बाबांचा खास किस्सा

मिलिंद गवळींच्या बाबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्यांनी खास पोस्ट लिहीली आहे

Devendra Jadhav

Milind Gawali News: आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळी यांच्या बाबांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने मिलिंद यांनी वडिलांसाठी खास पोस्ट लिहीली आणि वाढदिवस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केलेत.

मिलिंद गवळी हे फोटो पोस्ट करुन लिहीतात, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा,
माझ्या जन्मदात्याचा जन्मदिवस वय वर्ष ८४ पूर्ण , ८५ मध्ये पदार्पण ३२ ते ३५ वर्षाच्या माणसांची एनर्जी तरुण मुलांना लाजवेल इतकं काम करायची आजही इच्छा आणि क्षमता आहे,
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष पद आजही यशस्वीपणे पार पाडत आहेत."

मिलिंद गवळी पुढे लिहीतात, "रिटायर झालेले पेन्शनर साठी आजही झगडत आहेत, त्यांच्या हक्कासाठी, दुसऱ्याचं चांगलं व्हावं , त्याचं कल्याण व्हावं म्हणून सततचा ध्यास, कोणीही त्यांच्याकडे मदत मागावी आणि आपण ती मनापासून मदत करावी, ते ही आनंदाने , त्याला मदत करण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे , त्या माणसाचं काम पूर्ण होईपर्यंत त्या कामाचा पाठपुरावा करत राहावा, हा तर त्यांच्या स्वभावाचा भाग आहे."

मिलिंद गवळी पुढे लिहीतात, "पोलीस खात्यात काम करत असताना खंडेलवाल Company ची एक केस , तब्बल २९ वर्ष लागले त्या केस चा निकाल लागायला तोपर्यंत सतत कोर्टाची तारीख न चुकता, रिटायर झाल्यानंतर सुद्धा , पुढचे पंधरा वर्षे , त्या केस साठी लढत राहिले.
त्या केसा चा आरोपी हा convict होईपर्यंत त्या केसा पाठपुरावा त्यांनी केला, शेवटी Judge त्यांना म्हणाले की कुठलाही ऑफिसर रिटायर झाल्यानंतर केस इतकी सातत्याने चालवत नाहीत, दुसऱ्यावर सोपवून निघून जातात, गवळी साहेब तुमची कमाल आहे.
37 वर्ष प्रामाणिक काम करून पोलीस खात्यातून ते असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून रिटायर झाले. पण त्यानंतर सुद्धा सातत्याने काम करत आहेत."

मिलिंद गवळी शेवटी लिहीतात, "मी Retired झालो नाही तर Retyres करणार आहे
जसे गाडी चे tyres change करून ती पुन्हा वेगाने धावायला तयार होते ,तसाच मी सुद्धा आता पुन्हा माझ्या कामाला लागणार. आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांचं काम चालूच आहे,
आज ते महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, 166 फ्लॅट असलेल्या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत, आजही निस्वार्थ काम चालूच आहे,
समाजाला , देशाला अशाच माणसांची गरज असते, पप्पा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, माझं ही आयुष्य तुम्हाला लाभो , हिच ईश्वरचरणी प्रार्थना, you are my hero."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT