Aai Kuthe Kay Karte, Aai Kuthe Kay Karte episode update, Aai Kuthe Kay Karte todays episode SAKAL
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: वीणा जोमात, अनिरुद्ध कोमात.. सर्वांसमोर वीणाने दाखवली अनिरुद्धला त्याची योग्य जागा

मालिकेच्या नवीन भागात वीणा अनिरुद्धला सर्वांसमोर खडे बोल सुनावणार आहे.

Devendra Jadhav

Aai Kuthe Kay Karte Episode Update News: आई कुठे काय करते मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे. मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. गेली 3 वर्ष मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनास खरी उतरली आहे.

आता आई कुठे काय करते मालिकेत आशुतोषची बहिण वीणाची एन्ट्री झालीय. वीणा ही अनिरुद्धची आता बिझनेस पार्टनर सुध्दा झालीय. पण मालिकेच्या नवीन भागात वीणा अनिरुद्धला सर्वांसमोर खडे बोल सुनावणार आहे.

(aai kuthe kay karte fame Veena shows Anirudh his rightful place in front of everyone)

वीणा देशमुख कुटुंबातील सर्वांना ती आणि अनिरुद्ध आता एकत्र बिझनेस करणार आहेत, असं सांगते. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. अरुंधती आणि आशुतोष दोघेही शॉक झाले.

या सर्व गडबडीत ईशा आणि अनिशचा साखरपुडा संपन्न होतो. दोघेही सर्वांच्या उपस्थितीत एकमेकांच्या हातात अंगठी घालून साखरपुडा करतात. दोघांचे कुटुंबीय सुद्धा खुश असतात.

अशातच वीणा आणि अनिरुद्ध यांच्या एकत्र येण्याने देशमुख कुटुंब शिवाय अरुंधती - आशुतोष यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. आशुतोष वीणाशी काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून तिला बाहेर घेऊन जातो.

वीणा आणि आशुतोष बाहेर उभे असतात. आशुतोषच्या मनात असंख्य प्रश्न असतात. वीणा त्याला म्हणते, मी माझ्या बाबांचा व्यवसाय सांभाळायचं ठरवलं आहे.

तेव्हा आशुतोष काहीतरी बोलायला जाणार तोच अनिरुद्ध तिथे येतो. तो विणाला म्हणतो, "तुम्हाला कोणाचाही सल्ला ऐकण्याची किंवा आशुतोषला विचारण्याची काही गरज नाहीये"

अनिरुद्धची लुडबुड बघताच वीणा संतापते, ती अनिरुद्धला लागलीच सूनावते, "आशुतोष माझ्या सख्ख्या भावापेक्षा काही कमी नाही. त्यामुळे मी आशूला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही."

हे ऐकल्यावर अनिरुद्धचा चेहरा चांगलाच पडतो. आता वीणा आशुतोषचं म्हणणं ऐकून अनिरुद्धची बिझनेस ऑफर नाकारणार का? याचा उलगडा आई कुठे काय करते मालिकेच्या पुढील भागात होईलच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT