Aai Kuthe Kay Karte esakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेत ट्वीस्ट, आशुतोषचं निधन; नेटकरी संतापून म्हणाले, "काय फालतुगिरी आहे..."

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते या मालिकेत मोठा ट्वीस्ट आला आहे. अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचं निधन झालं आहे.

priyanka kulkarni

Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करते. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. तसेच या मालिकेत अनेक ट्वीस्ट देखील येत असतात. अशातच आता आई कुठे काय करते या मालिकेत मोठा ट्वीस्ट आला आहे. अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचं निधन झालं आहे. अशातच आता आशुतोषची आई अरुंधतीला घराबाहेर काढणार आहे, असं या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

आई कुठे काय करते मालिकेत मोठा ट्वीस्ट

नुकताच आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आशुतोषच्या फोटोला हार घातला आहे आणि फोटोजवळ बासून अरुंधती रडत आहे, फोटोचा हार खाली पडतो. तो हार व्यवस्थित फोटोला घालण्यासाठी अरुंधती उठते, पण आशुतोषची आई तिला थांबवते. आशुतोषची आई अरुंधतीला घराबाहेर काढते पण कांचन अरुंधतीला म्हणतात, मी अरुंधतीला घेऊन जायला आले आहे. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं, "सुरु होणार अरुंधतीचा नवा प्रवास..."

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी या मालिकेला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "प्रवासात उलट्या होतायत लोकांना आता" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "काय फालतुगिरी आहे फक्त वेगवेगळ्या लोकांशी लग्न हेच आयुष्य आहे का आजकाल मराठी मालिकामध्ये सतत लग्न आणि अफेअर इतकंच दाखवून समाज बिघडवण्याचं काम चालू आहे.", "हे देवा.. अजुन काय पाहावा लागणार. खरच कलाकर आणि दिग्दर्शन यामुळे अजुन तरी आम्ही मलिका बघत आहोत, नाहीतर कथानक पांचट आहे.", अशी कमेंट केली एका नेटकऱ्यानं केली.

पाहा प्रोमो:

आई कुठे काय करते मालिकेची स्टार कास्ट

आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभुलकर या साकारतात. तसेच या मालिकेत रुपाली भोसले आणि मिलिंद गवळी हे देखील भूमिका साकारतात.

(Arundha is the star cast of the series)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

SCROLL FOR NEXT