aai kuthe kay karte latest update attack on arundhati kelkar house veena's past sakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: अरूंधतीच्या नव्या संसारात विघ्न! घरावर झाला हल्ला; आता समोर येणार वीणाचा भूतकाळ..

'आई कुठे काय करते' मालिकेत मोठं वादळ..

नीलेश अडसूळ

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : आई कुठे काय करते मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणार आहे. या मालिकेत रोज नवा ट्विस्ट येत आहे. त्यात अरूंधतीचे दुसरे लग्न आणि वीणाची एंट्री यामुळे मालिका टीआरपी मध्ये देखील पुढे आली आहे.

मालिकेत काही दिवसांपुर्वीची आशुतोषची बहीण वीणाची एंट्री झालीय. वीणा ही अनिरुद्धची बिझनेस पार्टनर आहे. शिवाय तिचा अनिरुद्धवर प्रचंड विश्वास आहे. एवढेच नाही तर त्यांच्यात आता मैत्रीचे संबंध बहरू लागले आहेत.

नुकतेच आपण पाहिले की वीणामुळे संजना आणि अनिरुद्ध यांच्यातील संबंधही बिघडले आहेत. वीणामुळे एकीकडे अरुंधती आणि संजनाच्या संसाराची वाताहात होत असतानाच आता वीणाचा भूतकाळ समोर येणार आहे.

( Aai Kuthe Kay Karte latest update aniruddha forgot sanjana's birthday and celebrating success with veena)

झाले असे की वीणा हट्ट करून अरुंधती आणि सुलेखा ताईंना पाणीपुरी खायला नेते. त्यानंतर वीणाच्या फोनवर एक मेसेज येतो आणि ती पुन्हा बिथरते. घरी आल्यावरही ती प्रचंड घाबरलेली असते, अरूंधती तीला धीर देते. पण वीणा प्रचंड घाबरलेली असतानाच केळकरांच्या घरावर हल्ला होता.

याबाबतचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे त्यामध्ये अरूंधतीच्या नव्या घरी म्हणजे आशुतोष केळकरच्या घरावर हल्ला होताना दाखवला आहे. अरुंधती, वीणा, नितीन, सुलेखा ताई सगळे घरात असतानाच त्यांच्या घरावर हल्ला होतो.

कुणीतरी बाहेरून त्यांच्या घरावर दगडफेक करतं, त्यांच्या काचा फोडतं. एवढंच नाही तर कुणीतरी त्यांच्या दारावर येऊनही हल्ला करायचा प्रयत्न करत..हे हल्ल्यामुळे घरातले सगळेच घाबरतात. यामध्ये वीणालाही मोठा मानसिक धक्का बसलेला असतो.

मग नितीन धीर एकवटून हातात काठी घेऊन दारावर जातो, आणि दार उघडतो. आता दारावर कोण असेल? कुणी केला असेल हा हल्ला हे उघड होणार आहे. पण या हल्ल्यामुळे अरूंधतीवरील संकट अधिकच वाढणार आहे.

असं म्हणतात की, आता मालिकेत महत्वाचा ट्रॅक येणार आहे. ज्यामध्ये वीणाचा भूतकाळ उलगडणार आहे. आता काय असेल वीणाचा भूतकाळ.. कोण असेल तिचा पती.. हे पाहणे उत्कंठा वर्धक असणार आहे.

सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून प्रेक्षकांना अता नव्या भागाची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT