Aai Kuthe Kay karte marathi serial latest update aniruddha make dispute between veena and ashutosh sakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay karte: अनिरुद्धची नवी खेळी.. वीणाही अडकली जाळ्यात, आता बहीण-भावात पाडणार फूट..

अनिरुद्ध काही सुधारायचं नाव घेईना, आता वीणाचा करतोय वापर..

नीलेश अडसूळ

Aai Kuthe Kay karte: स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. कारण अखेर अरुंधतीचं आशुतोष सोबत लग्न होऊन ती संसाराला लागली आहे. मालिकेत नुकताच अरुंधतीच्या मुलीचा म्हणजे इशाचा साखरपुडा पार पडला, पण याच साखरपुड्यात एक नवं विघ्न देशमुखांच्या घरात आलं..

ते म्हणजे या दिवशी देशमुखांच्या घरात एका सुंदर महिलेची एंट्री होती आणि अनिरुद्ध सर्वांना सरप्राइज देतो. ती अनिरुद्धची नवी बिजनेस पार्टनर आणि आशुतोषची बहीण वीणा असते. त्यामुळे ही ऐकून सगळेच थक्क होतात.

तेव्हा अनिरुद्ध वीणाला हाताशी धरून काहीतरी खेळी करेल, असे अरुंधतीच्या मनात येते. आणि आता त्याची प्रचितीही येऊ लागली आहे. नुकताच एक प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे. त्यामध्ये अनिरुद्ध आशुतोष आणि वीणा मध्ये फूट पाडताना दिसत आहे.

(Aai Kuthe Kay karte marathi serial latest update aniruddha make dispute between veena and ashutosh)

या प्रोमो मध्ये दिसते की, आशुतोष वीणाच्या वडिलांच्या बिझनेसचे मालकी हक्क तिच्याकडे सुपूर्द करण्यासाठीची कागदपत्र तिला देतो. तिला तो असेही सांगतो की ही कागदपत्र वाचून घे. मात्र वीणा आशुतोषवरील विश्वासापोटी ती कागदपत्र न वाचताच सही करायला जाते.

त्यावेळी अनिरुद्ध तिच्या हातातील पेन खेचून घेतो आणि तिला थांबवतो. तिला म्हणतो, कितीही जवळचं नातं असलं तरी असं न वाचता निर्णय घेणं चांगलं नाही..'

अनिरुद्धची नवी खेळी वीणा आणि आशुतोष या बहीण भावांमध्ये चांगलंच वादळ आणणार असं दिसत आहे. पण त्यांच्या मध्ये अरुंधती खंबीरपणे उभी आहे. या संवादातही शेवटी अरुंधती मध्ये पडते.

अनिरुद्ध (aai kuthe kay karte) जेव्हा वीणाला सही करण्यापासून अडवतो. तेव्हा वीणा म्हणते अरे मग तू वाच ना ही कागदपत्र.. तेव्हा अनिरुद्ध वीणाच्या हातून कागदपत्र वाचायला घेतो. पण अरुंधती मध्ये पडते आणि वीणाला सांगते, ''वीणा ही कागदपत्र तू वाचणार आहेस, तर ती तुझ्याकडेच ठेव'.

अरुंधतीचा बददलेला सूर हा अनिरुद्धला इशारा देणारा असतो. त्यामुळे आता वीणा आणि आशुतोषचे नाते टिकवण्यासाठी अरुंधती कशी ठामपणे उभी राहणार हे आगामी भागात कळेल. यामध्ये अनिरुद्ध काय भूमिका घेणार हेही उत्सुकता वाढवणारे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

SCROLL FOR NEXT