aai kuthe kay karte serial completes 1000 episodes rupali bhosle thanks writer namita vartak  SAKAL
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: "तुझा एक फोन आणि मी तुला दिलेला शब्द", मालिकेचे १००० भाग पूर्ण झाल्याबद्दल रुपाली भोसलेने मानले या व्यक्तीचे आभार

आई कुठे काय करते मालिकेचे १००० भाग पूर्ण झालेत त्यानिमित्ताने रुपालीने मालिकेसंबंधी एका खास व्यक्तीचे आभार मानले आहेत

Devendra Jadhav

Marathi TV Searial : आई कुठे काय करते मालिका ही मराठी प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय. आई कुठे काय करते गेली ३ - ४ वर्ष कोणताही खंड न पडता प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. आई कुठे काय करते मालिकेचे १००० भाग पूर्ण झालेत.

अशातच मालिकेत संजनाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मिडीयावर पोस्ट करत मालिकेसंबंधी एका खास व्यक्तीचे आभार मानले आहेत.

(aai kuthe kay karte serial completes 1000 episodes)

१००० भाग पूर्ण भाग झाल्याने रुपाली भोसलेने मानले या व्यक्तीचे आभार

रुपाली भोसले आई कुठे काय करते मालिकेत संजनाची भुमिका साकारत आहे. रुपालीने सोशल मिडीयावर १००० भागांच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत एक खास पोस्ट केलीय.

रुपाली लिहीते.. "एखाद्या प्रोजेक्टला एवढं प्रेम मिळणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. इतके वर्ष आम्हाला एका कुटुंब सारखं वागवलं जातं. नमिता वर्तक थँक्यू मला संजना दिल्याबद्दल तुझा कॉल आणि तुला दिलेला शब्द मला आज सुद्धा लक्षात आहे. आणि मी संजना कायम त्याचप्रमाणे आणि प्रामाणिकपणे लोकांसमोर सादर करेन. तुझा माझ्यावरचा विश्वास माझी ताकद आहे. मी तुझे आभार शब्दात मांडू शकत नाही.

मालिकेचे सहकलाकार एकमेकांच्या पाठीशी

रुपाली पुढे लिहीते.. "याशिवाय मालिकेचे संपूर्ण कलाकार आणि कृ मेंबर हे एकमेकांना कायम मदत करत असतात. या मोठ्या प्रवासात सगळेच एकमेकांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. आता १००० भाग झाले आहेत. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आई कुठे काय करते टीम आणि स्टार प्रवाह रॉक्स." अशी पोस्ट करत रुपालीने मालिकेच्या लेखिका नमिता वर्तक, सहकलाकार आणि टीमचे आभार मानले पाहिजेत

आई कुठे काय करते TRP त कायम टॉप 5 मध्ये

आई कुठे काय करते मालिका २०१९ ला स्टार प्रवाहवर सुरु झाली. या मालिकेला सुरुवातीला हवा तसा TRP मिळाला नाही. पण कोविडच्या काळात प्रेक्षकांना या मालिकेची रंगत जाणवली. कोविडच्या काळात जेव्हा लोकं घरी टीव्हीसमोर वेळ काढत होते तेव्हा त्यांनी मालिकेला चांगला प्रतिसाद दिला.

आई कुठे काय करते मालिकेला ४ वर्ष झाली तरीही मालिका TRP मध्ये कायम पहिल्या पाच नंबरमध्ये असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT