Aai Kuthe Kay Karte serial latest update abhishek anagha arundhati sakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे.. मध्ये मोठा ट्विस्ट! अनघाला दगा देणाऱ्या अभिनं लेकीला..

सध्या आई कुठे काय करते मालिकेत रोज नवा ट्विस्ट येत आहे.

नीलेश अडसूळ

Aai kuthe kay karte update: 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. रोज नवा ट्विस्ट नवं वळण ही मालिका घेत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत अनघाच्या डोहाळजेवणाचा घाट घातला होता. यावेळी अरुंधती म्हणजेच आई अभीचं बाहेर प्रेम प्रकारण सुरू असल्याचं सर्वांसमोर उघड करते. आपण गरोदर असताना आपल्या नवऱ्याचं बाहेर प्रेमप्रकारण आहे ही कळताच अनघा भर डोहाळ जेवणात चक्कर येऊन पडते अत्यंत कठीण परिस्थितीत तिची प्रसूती होते. त्यानंतर अभि आणि अनघामध्ये चांगलीच दरी पडलेली दिसते. आता मालिका अधिकच रंजक वळणावर आहे.

(Aai Kuthe Kay Karte serial latest update abhishek anagha arundhati)

अभिचे विवाहबाह्य संबंंध असल्याने अनघा आणि अभिषेक यांच्या नात्यात दुरावा आला आहे. अनघाच्या मनात अभि विषयी प्रचंड राग आहे. अनघा अभिला बाळाच्या जवळ देखील येऊ देत नाही. त्यामुळे अभि आणि तिच्यामध्ये छकुलीमुळे रोज भांडण होत आहे. त्यांच्यात प्रचंड तणाव असतानाच मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. अनघा बाळाला घेऊन कायमची माहेरी निघून जाणार अशी परिस्थिती दिसत असतानाच अभि आणि अनघा यांच्यात जोरदार खटके उडतात. अभि अनघाला म्हणतो 'तू जर बाळाला माझ्यापासून दूर केलंस तर मी वाट्टेल ते करीन'. त्याच रात्री अनघाला कळतं की बाळ तिच्याशेजारी नाही. ती घाबरते.

बाळाला घेऊन अभि कुठेतरी गेला या भीतीने सगळ्यांना ती जागं करते. सगळे अभिला शोधायला बाहेर पडतात. पण अभि बाहेर बागेत बाळाला खेळवत बसलेले असतात. हे पाहून सगळेच भावुक होतात. अभिषेक आणि अनघा यांच्यात वाद असला तरी लेकीसाठी मात्र त्यांचा जीव तळमळतो आहे. त्यामुळे हा भावनिक प्रसंग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT