Rashmika Mandana and Bindhast Mulgi's Grandmother Google
मनोरंजन

आजीबाईंच्या ठुमक्यांपुढे नॅशनल क्रश रश्मिकाही पडली फिकी;पहा व्हिडीओ

'पुष्पा' सिनेमातील 'सामी सामी' गाण्यावर केलेला डान्स पाहून इन्स्टाग्राम युजर्स झाले फिदा

प्रणाली मोरे

'सामी सामी' या 'पुष्पा' सिनेमातील गाण्यावर सिनेमातील अभिनेत्री रश्मिका मंदानानंतर(Rashmika Mandana) आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य मुलींपर्यंत साऱ्यांनीच डान्स करून आपली हौस भागवलेली आहे. सोशल मीडियावर तर या गाण्याच्या डान्सिंग रीलचा तर नुसता धो-धो पाऊस पहायला मिळाला. खरंतर प्रदर्शनाआधीच सिनेमातील या गाण्यानं लोकांना वेडं करून टाकलं होतं. गाण्याचे बोल,ताल,ठेका अनं अर्थात नॅशनल क्रश रश्मिकाची अदा साऱ्यानेच या गाण्याला चारचॉंद लावले होते. सिनेमा प्रदर्शित होऊन इतके दिवस झाले तरी सिनेमाची अन् 'सामी सामी' गाण्याची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. एका सत्तर-ऐंशी वर्षाच्या आजीचा या गाण्यावर ठेका धरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ही आजीबाई इन्स्टाग्रामला तशी चांगलीच परिचित आहे. गावाकडच्या या आजीच्या नातीनं तिला ही प्रसिद्धी मिळवून दिलीय. ही आजी आणि तिची नात नेहमीच इन्स्टाग्रामवर काही ना काही मजेशीर व्हिडीओ शेअर करीत असतात,ज्याला युजर्सकडून प्रसिद्धिही मिळते. इन्स्टाग्रामवर 'बिनधास्त मुलगी' या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये 'सामी सामी' गाण्यावर आजीला डान्स करण्यासाठी नात मस्का लावताना दिसतेय तर आधी नाही नाही म्हणणारी आजी अशी काय मूड मध्ये येऊन ठुमके लगावते की पहाणाऱ्याला घाम फुटलाच पाहिजे.

या व्हिडीओवर काही तासातच प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडेल की ही बिनधास्त मुलगी आहे तरी कोण? तिचं नाव आहे गौरी पवार,. गौरी फक्त इन्स्टाग्रामच नाही तर युट्युब चॅनेलही चालवते. टॉम बॉय असणाऱ्या मुलीनं बिनधास्त जगावं आणि मनाला वाटेल तसं वागावं अशा संकल्पनेतून गौरी पवारनं आपल्या चॅनेलला हे नाव दिले आहे. गौरीला या कामात तिच्या आजीचीही उत्तम साथ मिळत आहे. युजर्स या आजी-नातीच्या जोडीला चांगलेच पसंत करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

Xi Jinping दिल्लीत दाखल; सोबत काय आणले? 15 हजार पोलीस, ‘भयानक’ ताफा अन् खास कार-विमान

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Jharkhand Health : कॅन्सर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयांत ‘डे-केअर सेंटर’, आयुष्मान कार्डधारकांना पॅकेज दरात उपचार

SCROLL FOR NEXT