Aalay Mazya Rashila marathi movie poster launched by mns chief raj thackeray  sakal
मनोरंजन

Aalay Mazya Rashila: तुमच्या राशीला आलेल्या इरसाल नमुन्यांची रास माहितीय? याचं भन्नाट उत्तर येतंय लवकरच..

‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित..

नीलेश अडसूळ

Aalay Mazya Rashila: आपल्या राशीचक्रातल्या बारा राशी या अतिशय मनोरंजक आहेत. प्रत्येक राशीचं स्वभाव वैशिष्ट्य, सौंदर्य आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या बारा राशींचा आणि मानवी भावभावनांचा खूप जवळचा संबंध आहे.

त्यामुळे या विविध राशींच्या व्यक्तिरेखांना अभ्यासणे हे सुद्धा खूपच मनोरंजक आहे. या सगळ्याच धमाल चित्रण असलेला ‘आलंय माझ्या राशीला’ हा मराठी चित्रपट १० फेब्रुवारीला आपल्या भेटीला येणार आहे.

मराठी सिनेसृष्टीच्या अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

(Aalay Mazya Rashila marathi movie poster launched by mns chief raj thackeray )

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा


चित्रपटाच्या वेगळया विषयाचे कौतुक करीत राजसाहेब ठाकरे यांनी चित्रपटाला खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रपटातील अभिनेत्री निर्मिती सावंत, निर्माते आनंद पिंपळकर, सहनिर्माते दिलीप जाधव, युवा अभिनेता प्रणव पिंपळकर, दिग्दर्शक अजित शिरोळे उपस्थित होते.

‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर‌, सिद्धार्थ खिरीड यांच्या भूमिका आहेत. अभिनेता प्रणव पिंपळकर या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करतोय.

‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. सहनिर्माते दिलीप जाधव आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर ओंकार माने, प्रणव पिंपळकर आहेत.

गीते गुरु ठाकूर, अभय इनामदार, कौतुक शिरोडकर यांनी लिहिली आहेत. छायांकन कृष्णा सोरेन यांचे तर संकलन विजय खोचीकर यांचे आहे. पार्श्वसंगीत मिलिंद मोरे यांचे आहे.

वेशभूषा मैत्रीयी शेखर आणि संगीता तिवारी यांची आहे. ध्वनी अशोक झुरुंगे तर नृत्य सुजितकुमार, नरेंद्र पंडित, प्रितम पाटील यांचे आहे. साहसदृश्ये अकबर शरीफ तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील यांनी सांभाळली आहे. व्हीएफएक्सची जबाबदारी श्रेयस केदारी, रितेश पवार यांनी सांभाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT