Bigg Boss OTT 2 Aaliya Siddiqui Evicted Esakal
मनोरंजन

Aaliya Siddiqui Evicted: शेवटी नवाजच्या बायकोला बिग बॉसनं काढलं घराबाहेर! दहा दिवसातच केलं टाटा गूडबाय

Vaishali Patil

Mid-Week Evicted In Bigg Boss OTT 2: गेल्या काही दिवसांपासून OTT बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनची जोरदार चर्चा सुरु आहे. 'बिग बॉस ओटीटी' हा सिझन इतर बिगबॉसच्या सिझन पेक्षा बराच वेगळा आहे याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे.

यावेळच्या शोमध्ये अनेक वेगवेगळे ट्विस्ट आणि नवे नियम स्पर्धकांनासाठी आहे. शो ला सुरु होऊन फक्त एक आठवडाचा झाला आहे. आणि या एका आठवड्यातच घरातुन तीन स्पर्धकांना घराबाहेर काढण्यात आलं आहे.

सुरवातीला पुनित रॉकस्टारला पहिल्या दिवशी घरातील वस्तूचं नुकसान केल्यामुळं काढण्यात आलं होत. त्यानंतर आठवड्याच्या नॉमिनेशनमध्ये पलक पुरस्वानीला कमी मतामुळे घराबाहेर काढण्यात आलं होतं.

त्यातच आता आठवड्याच्या मध्येच आलिया सिद्दीकी घरातुन बाहेर काढण्यात आलं आहे. आलिया सिद्दीकीला 'बिग बॉस OTT 2' मधून मिड वीक इव्हिकशनमधून बाहेर काढण्यात आले आहे. 'बिग बॉस ओटीटी 2' च्या लाईव्ह फीडमध्येही आलिया शो मध्ये दिसली नाही.

26 जून रोजी झालेल्या या सीझनच्या दुसऱ्या नॉमिनेशनमध्ये, जिया शंकर आणि आलिया सिद्दीकीला नॉमिनेट करण्यात आलं होते. तेव्हापासून सोशल मीडियावर आलियाला या आठवड्यात घराबाहेर काढण्यात येणार अशी चर्चा होती.

तसचं काहीसं झालही अवघ्या 10 दिवसांत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाला घरातून बाहेर पडावं लागलं.

बिग बॉसने नुकत्याच आयोजित केलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये जिया शंकर आणि आलिया सिद्दीकी यांना 15 मिनिटांचा वेळ दिला होता ज्यामध्ये त्यांना बॅग पॅक करायची होती, या घोषणेनंतर बिग बॉसने आपला निर्णय देली आणि कमी मतांमुळे आलियाला घर सोडावं लागलं.

बिग बॉस ओटीटीचा 2 सीझन वेगळा आहे. यात प्रेक्षकांना घरातील समस्यांमध्ये थेट हस्तक्षेप करता येणार आहे.आलिया घरात आल्यापासून टार्गेटवर होती. ती घरात फक्त व्हिक्टिम कार्ड प्ले करत होती.

सलामाननेही तिला घरात स्वत:ला सिद्ध करण्यास सांगतिले होते. पण ती फक्त स्टारची बायको म्हणुन फिरत होती. फक्त तिचीच घरातील कहाणी सांगत होती. तिला पुजा भट्टने देखील हेच समजावले होते मात्र तरीही ती घरात तिचं वैयक्तिक आयुष्याबद्दलच बोलत असल्याने प्रेक्षकांनाही ती खटकली आणि तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT