Aaliyah Kashyap Engagement anurag kashyap daughter at mumbai with hindu rituals  SAKAL
मनोरंजन

Aaliyah Kashyap Engagement: अनुराग कश्यपची लेक आलियाने हिंदु रितीरिवाजानुसार मुंबईत केला साखरपुडा

अनुराग कश्यपची मुलगी आलियाचा मुंबईत साखरपुडा झालाय

Devendra Jadhav

Aaliyah Kashyap Engagement News: प्रसिद्ध फिल्ममेकर आणि अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिने काही महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत परदेशात साखरपुडा केला होता.

शेनने अंगठी घालून आलियाला लग्नासाठी प्रपोज केले. परदेशात साखरपुडा केल्यानंतर या जोडप्याने आज म्हणजेच ३ ऑगस्टला मुंबईत हिंदू रितीरिवाजांनी साखरपुडा केला. आलिया कश्यपच्या एंगेजमेंटला अनेक सिनेस्टार्सही हजेरी लावत आहेत.

(Aaliyah Kashyap Engagement)

आलियाचा साखरपुड्याचा लुक

आलिया आणि शेनच्या साखरपुडा सोहळ्यात आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयर यांनी खास लुक केला होता. आलियाने तिच्या एंगेजमेंटमध्ये ऑफ-व्हाइट लेहेंगा घातला आहे, ज्यावर बहुरंगीत एम्ब्रॉयडरी आहे.

तर शेन ग्रेगोयरही आपल्या होणाऱ्या बायकोला मॅचिंग कपडे परिधान करताना दिसला. शेनने ऑफ व्हाइट कलर मॅचिंगची शेरवानी घातली आहे. दोघांनी मीडियासमोर पोज दिली.

वयाच्या २२ व्या वर्षी केला साखरपुडा

आलियाचे फक्त 22 वर्षांची आहे. तिने अगदी लहान वयातच आयुष्याचा जोडीदार निवडला आहे. या वयात एंगेज झाल्यामुळे आलिया खूप खूश आहे. आलियाचे वडील आणि फिल्ममेकर अनुराग कश्यप सुद्धा लेकीच्या साखरपुड्यात खुश होते.

आलिया आणि शेन लवकरच करणार लग्न

यापूर्वी, आलिया आणि शेन यांनीही त्यांच्या लग्नाबद्दल खुलासा केला होता आणि सांगितले होते की ते दोघे लग्न करणार आहेत. हे जोडपे 2025 मध्ये लग्न करणार आहेत. लग्नाआधी एंगेजमेंट एन्जॉय करायची आहे.

आलिया आणि शेनने असेही सांगितले की ते भारतात पारंपारिक हिंदू विवाह सोहळ्यात आणि नंतर अमेरिकेत ख्रिश्चन समारंभात लग्न करणार आहेत. या दोघांच्या साखरपुड्याला अनेक तारे - तारके उपस्खित आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शब्द उधार घेतो, लाव रे तो व्हिडीओ! फडणवीसांनी ठाकरे बंधूंना त्यांच्याच व्हिडीओतून दिलं उत्तर, ३ मिनिटांचा VIDEO दाखवला

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात ऐन हिवाळ्यात पावसाच्या जोरदार सरी, कमी दाबाचा पट्टा

यंदा शाळांना ४५ दिवसांची उन्हाळा सुट्टी! जानेवारी ते जूनपर्यंत ७६ दिवस विद्यार्थ्यांना सुट्ट्या; एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा

Satara News: एसटीतील सुट्या पैशांच्‍या वादाला ब्रेक; यूपीआय पेमेंटद्वारे तिकिटे काढण्‍यास प्रतिसाद, पारदर्शकतेतही वाढ!

घरकूल लाभार्थींसाठी मोठी बातमी! घरकुलावर सौर संच बसवायला मिळणार ‘CSR’ फंड; लाभार्थींना बॅंकेतूनही घेता येणार कर्ज; घरकूल लाभार्थींना २.१० लाख अनुदान

SCROLL FOR NEXT