Fatima Sana Shaikh, Aamir Khan 
मनोरंजन

आमिर खान-फातिमाच्या लग्नाचा फोटो व्हायरल; जाणून घ्या सत्य..

सोशल मीडियावर या दोघांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

स्वाती वेमूल

१५ वर्षांच्या संसारानंतर अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि किरण रावने (Kiran Rao) घटस्फोट घेतला. २००५ मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टने घटस्फोट का घेतला, या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं, असे अनेक प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित झाले होते. या सर्वात अभिनेत्री फातिमा सना शेखसुद्धा (Fatima Sana Shaikh) ट्विटरवर ट्रेंड झाली होती. फातिमाने 'दंगल' या चित्रपटात आमिरच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर आमिर आणि फातिमा यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चा होत्या. आता सोशल मीडियावर आमिर आणि फातिमाच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. या दोघांनी लग्न केल्याचं या फोटोमध्ये म्हटलं जात आहे.

मध्यंतरीच्या काळात आमिर आणि फातिमा यांच्यात काहीतरी शिजत असल्याची जोरदार चर्चा होती. फातिमाने आमिरच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटातही काम केलं होतं. या दोन्ही चित्रपटांनंतर या दोघांमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा होती. मात्र फातिमाने वेळोवेळी अफेअरच्या चर्चा नाकारल्या होत्या.

व्हायरल फोटोमागचं सत्य-

आमिर आणि फातिमाचा व्हायरल होत असलेला हा फोटो खरा नाही. हा फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय. मूळ फोटोमध्ये आमिर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावसोबत उभा आहे. किरणच्या चेहऱ्याच्या जागी फातिमाचा चेहरा एडिट करून हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला गेला आहे. आमिर आणि किरणचा मूळ फोटो हा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या साखरपुड्यातील आहे.

घटस्फोटाविषयी काय म्हणाले होते आमिर-किरण?

'विभक्त होण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती आणि आता आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत. मुलगा आझादचं संगोपन आम्ही दोघं मिळून करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्ट्सवर सोबत काम करणार आहोत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचे खूप आभार, कारण त्यांनी या निर्णयात आमची साथ दिली आणि आम्हाला समजून घेतलं. आमच्या हितचिंतकांनीही शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला द्याव्यात. घटस्फोट म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे', असं स्पष्ट केलं.

२०११ साली किरणने सरोगसीच्या आधारे मुलाला जन्म दिला. या दोघांना नऊ वर्षांचा आझाद हा मुलगा आहे. त्याआधी आमिरने १९८६ मध्ये अभिनेत्री रिना दत्ताशी लग्न केलं होतं. या दोघांना जुनैद हा मुलगा आणि आयरा ही मुलगी आहे. २००२ साली या दोघांनी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर दोन्ही मुलांचा ताबा रिना दत्ताला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT