Aamir Khan says Pritam Pyaare star and son Junaid Khan esakal
मनोरंजन

Aamir Khan: 'मला तुमची गाडी नकोच, मी यापुढे....' आमिर खानच्या मुलानं जुनैदनं स्पष्टपणेच सांगितलं

बॉलीवूडमध्ये आपल्या चित्रपटांमधून नेहमीच वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आमिर खानचा समावेश करावा लागेल.

युगंधर ताजणे

Aamir Khan says Pritam Pyaare star and son Junaid Khan : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानची मोठी ओळख आहे. सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. भलेही त्याच्या लाल सिंग चढ्ढाला प्रेक्षकांनी नाकारले असेल पण आमिरच्या चाहत्यांमध्ये काही कमी झालेली नाही.

बॉलीवूडमध्ये आपल्या चित्रपटांमधून नेहमीच वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आमिर खानचा समावेश करावा लागेल. त्यानं आजवर केलेल्या काही चित्रपटांमधून ठळकपणे सामाजिक संदेशही दिले आहेत. तारे जमीन पर, थ्री इडियट्स, सिक्रेट सुपरस्टार आणि दंगलमधून आमिर खाननं वेगळे भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमिर हा त्याच्या आगामी चित्रपटावरुन चर्चेत आला आहे. त्यानं त्याच्या नव्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. सितारे जमीन पर असे त्या चित्रपटाचे नाव असणार आहे. यासगळ्यात आमिरच्या मुलाच्या डेब्यूची चर्चा रंगली आहे. त्याच्याशी संदर्भात एक मुलाखत व्हायरल झाली असून त्यानं आमिरकडे कुठल्याही गोष्टींची मागणी केलेली नाही. त्याची चर्चा होत आहे.

आमिर म्हणतो, जुनैदला नेहमीच फ्लाईटनं प्रवास करायला आवडते. तो त्याच्या आवडीचा भाग आहे. जुनैद हा प्रीतम प्यारे नावाच्या बॉलीवूड चित्रपटातून डेब्यू करणार आहे. त्याची चर्चा रंगली आहे. त्यात आमिर देखील कॅमिओ करणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपट निर्माता म्हणून जुनैदचे नाव घेतले जात आहे. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या मुलाच्या डेब्यू वरुन चिंतेत होता.

आमिर त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, जुनैदकडे स्वताची कार नाही. तो शक्यतो सार्वजनिक वाहतूकीचा वापर करतो. त्यानं मला कार घेऊ नका असेही सांगितले होते. तो एका विद्यार्थ्यासारखा आहे. नेहमीच पहिलं राहणं त्याला आवडतं. काहीतरी वेगळं प्रयोग करत राहणं त्याला जमतं. त्यामुळे त्याच्याविषयी कुतूहलही आहे. अशा शब्दांत आमिरनं त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

आमिर पुढे म्हणतो, त्याला फ्लाईटपेक्षा रेल्वेचा प्रवासही खूप आवडतो. लोकांशी बोलायला आवडते. त्यामुळे त्याच्याकडे माहितीचा साठाही खूप आहे. त्याचा स्वभाव थोडासा वेगळा आहे. त्याला त्याच्या पद्धतीनं जगू देणं हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. असे मला वाटते. सिनेमात येण्यापूर्वी जुनैदनं सहा वर्षे थिएटरही केले आहे. असेही आमिरनं या मुलाखतीमध्ये सांगितले.a

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT