मनोरंजन

'भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस'; फैजलच्या व्हिडीओमुळे आमिर ट्रोल

बऱ्याच वर्षांनंतर फैजलचं बॉलिवूडमध्ये पुनरागमन

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (aamir khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी आमिर आणि किरण रावने (Kiran Rao) घटस्फोट घेतला. तेव्हा आमिरबद्दल अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त केली होती. आता आमिरचा भाऊ फैजल खानचा (faissal khan) एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अनेकांनी आमिरला ट्रोल केले आहे.

बरीच वर्षे बॉलिवूडमधून ब्रेक घेतल्यानंतर आमिरचा भाऊ फैजल खान लवकरच ‘फॅक्टरी’ या चित्रपटामधून कमबॅक करणार आहे. सध्या सोशल मीडियावर तो चर्चेत आहे. फैजलचा वडापाव खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये फैजल म्हणतो, 'मला वडापाव खूप आवडतो. मुंबईचा वडापाव मी लहानपणापासून खातोय. माझ्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये देखील वडापाव मिळत होता' या व्हिडीओला कमेंट करत अनेकांनी आमिरला ट्रोल केले आहे. 'आमिरने भावाचं आयुष्य उद्धवस्त केलं', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. तर दुसरा युझर म्हणाला, 'तो खूप निरागस आणि साधा दिसतोय.'

विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून फैजलने अभिनयक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या मेला या चित्रपटातील अभिनयामुळे फैजलला विशेष लोकप्रियता मिळाली. 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटामध्ये देखील फैजलने काम केले आहे. 3 सप्टेंबर रोजी फैजलचा ‘फॅक्टरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ट्रेलरमधील फैजलच्या भूमिकेन अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT