aamir khan kiran rao divorce latest news  esakal
मनोरंजन

Aamir Khan Kiran Rao : 'मला पुन्हा तू संधी नाही का देऊ शकणार?', आमिरनं किरणला केला होता प्रश्न, काय मिळालं उत्तर?

'त्या' मुलाखतीमध्ये आमिर खाननं किरण रावसोबतच्या (Aamir Khan Kiran Rao ) घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

युगंधर ताजणे

Aamir Khan And Kiran Rao News : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी भलेही एकमेकांपासून घटस्फोट घेतला असेल मात्र बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्यांची बॉडिंग दिसून येते. सध्या किरण रावच्या लापता लेडिजचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. यावेळी आमिरनं किरणला त्यांच्या विभक्त होण्यावरुन विचारलेला प्रश्न नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

त्या कॉनक्लेव्हमध्ये आमिरनं आपल्या घटस्फोटाविषयीच्या त्या गोष्टीचा खुलासा केला आहे. तो म्हणतो मी किरणला विचारले होते की, एक पती म्हणून तुला माझ्यामध्ये कोणत्या गोष्टींची कमी दिसते, तू मला संधी देऊ शकतेस का...त्यावर किरणनं दिलेलं उत्तर आणि आमिरविषयीच्या तक्रारींची यादी सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

आमिरनं एबीपीच्या कॉनक्लेवमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्यानं सांगितलं की, मी किरणकडे फीडबॅक मागितला होता की, माझ्यामध्ये पती म्हणून तुला कोणत्या गोष्टी खटकतात? त्यावर मी तिला अनेकदा विचारलेही होते, तुला माझ्यातील ज्या गोष्टींविषयी नाराजी आहे ते एकदा मला सांग. मी त्यात काही सुधारणा करु शकतो का, असाही प्रश्न मी किरणला विचारला होता. असेही आमिरनं यावेळी सांगितले.

किरणनं काय दिलं उत्तर?

आमिर खाननं त्या कॉनक्लेव्हमध्ये तो प्रश्न विचारल्यानंतर किरण म्हणाली, माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टींची यादी आहे. पहिली गोष्ट म्हणजे आमिर कुणाला कधीही बोलू देत नाही. तो त्याचेच म्हणणे आपल्याला पटवून देतो. दुसऱ्यांचे ऐकून घेत नाही. दुसऱ्याचे काही म्हणणे असू शकते यावर त्याचा विश्वासच नाही. दुसऱ्याला बोलू न देणे हे त्याचे वागणे मला अजिबात आवडत नाही.

आताची जी मुलाखत आहे त्यातही त्यानं मला खूप सारे मुद्दे लिहून काढण्यास सांगितले होते. पण यात ही त्यानं मला बोलू दिलेलं नाही. तो त्याच्याच मुद्दयावर अडून बसतो, दुसऱ्यांचे काही म्हणणे असू शकते असे त्याला वाटत नाही. असेही किरणनं यावेळी सांगितले.

किरण रावचे आगामी चित्रपट..

किरण रावनं बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कम बॅक केलं आहे. लापता लेडिजमधून त्यांनी दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख तयार केली आहे. येत्या शुक्रवारी लापता लेडीज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा असून त्याच्या व्हायरल टीझर अन् ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

किरण रावच्या या चित्रपटाची निर्मिती आमिर खाननं केली आहे. तसेच आमिर खानचा येत्या काळात सितारे जमीन पर नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार संतोषी च्या लाहोर १९४७ नावाच्या चित्रपटाची निर्मिती देखील आमिर खान करणार आहे. त्यात सनी देओल आणि प्रीति झिंटा यांची महत्वाची भूमिका असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT