aamir srk 
मनोरंजन

आमिर खानने 'लाल सिंह चढ्ढा'मध्ये फक्त शाहरुखसाठी केलं ‘हे’ काम

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलिवूडच्या ‘खान’दानपैकी मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंग चढ्ढा’ या सिनेमाचं शूट संपवून आता त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागणार आहे. आमिर खानच्या 'लाल सिंह चढ्ढा' या सिनेमात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. त्याच्या शूटिंगसाठी किंग खान दिल्लीला रवाना झाला होता. 

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेमातील केवळ शाहरुखच्या भागाचं दिग्दर्शन आमिरने स्वत: केलंय. यावेळी सेटवर दोघांनी मजामस्ती करत शूटिंग पार पाडलं. इतकंच नाही तर शूटिंग संपल्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत वेळ देखील घालवला.आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सची जबाबदारी शाहरुखची कंपनी सांभाळत आहे.

‘फॉरेस्ट गम्प’ या इंग्रजी सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. यामध्ये आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिका साकारतेय. करीनाने नुकतीच तिची शूटिंग संपवली असून सिनेमाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत  शूटिंग पूर्ण होणार असून नवीन वर्षात आमिरचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय.

दुसरीकडे शाहरुखने २०१८ मध्ये ‘झिरो’नंतर कोणत्याच सिनेमात काम केलं नाही. इतके दिवस त्याने कोणत्याही सिनेमाची घोषणासुद्धा केली नव्हती. त्यामुळे चाहत्यांकडून त्याला वारंवार नवीन सिनेमाबद्दल सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात होते. अखेर शाहरुख आगामी ‘पठाण’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दीपिका पदुकोण त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. शाहरुख आणि दीपिकाने याआधी ‘ओम शांती ओम’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय.

aamir khan directs shahrukh khan in laal singh chaddha playing cameo role in the film  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT