aamir khan emotional video at ira khan and nupur shikhare wedding udaipur  SAKAL
मनोरंजन

Ira Khan Wedding: अन् अश्रू अनावर... लेकीच्या लग्नात आमिर खान भावूक, व्हिडीओ व्हायरल

आमिरच्या लेकीच्या लग्नातला भावूक व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Ira Khan Wedding - Aamir Khan Video: आमिर खानची लेक आयरा खानचं काल उदयपूरमध्ये लग्न झालं. उदयपूरमध्ये आमिर खानच्या लेकीने बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत लग्न केलं.

नुपुर - आयराच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ - फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच लेकीच्या लग्नातला आमिरचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यावेळी आमिरचे अश्रू अनावर झालेले दिसले.

अन् आमिरचे अश्रू अनावर झाले

व्हायरल व्हिडिओमध्ये इरा आणि नुपूरचं लग्न संपन्न होताना दिसत आहे. अभिनेत्री झेन या लग्नाचं सुत्रसंचालन करत आहे.

इरा आणि नुपूर यांचं लग्न लागताच या दोघांनी एकमेकांना किस केलं. पुढे इरा - नुपुरने एकमेकांना अंगठी घातली. आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यावेळी आमिर भावूक झालेला दिसला. त्याला अश्रू अनावर झालेले दिसले. त्याने चष्मा बाजूला काढून डोळ्यातलं पाणी पुसलं.

आमिरने गाणं गाऊन केली लेकीची पाठवणी

आयरा - नुपुरचा लग्नातला एक व्हिडीओ समोर आलाय. यात स्टेजवर आमिर खानने पुर्वपत्नी किरण रावसोबत जुनी बॉलिवूड गाणी गाऊन सर्वांचं मन जिंकलं.

प्यार दिवाना होता है, पल पल दिल के पास अशी गाणी गाऊन आमिर भावूक झालेला दिसला. आमिरच्या या गाण्यात किरणने त्याला साथ दिली.

आयरा - नुपुरचं लग्न

आमिर खानची लेक आयरा खानने तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्न केले आहे. या लग्नात आमिर खानसोबत त्याची पुर्व पत्नी रीना दत्ता आणि किरण रावही दिसले. सर्वांनी नवविवाहीत दाम्पत्याला आशिर्वाद दिला.

उदयपूरमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नात आयरा पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि त्याला मॅचिंग ब्लेझर परिधान करत नुपुरही सर्वांचं लक्ष वेधून घेत होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT