aamir khan feeling emotional and announced daughter ira khan wedding date with nupur shikhre  SAKAL
मनोरंजन

Aamir Khan: लेकीची पाठवणी करताना रडणार का? असं विचारताच आमिर खान म्हणाला...

आमिर खानने लेक सासरी जाण्याच्या कल्पनेने मनातल्या भावना व्यक्त केल्यात

Devendra Jadhav

Aamir Khan News: आमिर खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. आमिर खानने आजवर विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आमिर खान हा त्याच्या मुलांवर सुद्धा खूप प्रेम करतो. शूटींगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत आमिर खान त्याच्या मुलांसोबत मजा - मस्ती करताना दिसतो.

आमिर खानची मुलगी इरा खान सध्या चर्चेत आहे. इरा लवकरच लग्न करणार असुन आमिर खान लेक सासरी जाण्याच्या कल्पनेने भावूक झालाय. याशिवाय त्याने लग्नाची तारीखही जाहीर केलीय.

(aamir khan feeling emotional about her daughter wedding)

आमिर खानने सांगितली मुलीच्या लग्नाची तारीख

न्यूज18 शी बोलताना आमिरने मुलीच्या लग्नाची तारीख जाहीर केली. आमिर म्हणाला, “इरा 3 जानेवारीला लग्न करत आहे. इराने निवडलेला आयुष्याचा जोडीदार नुपूर एक अत्यंत गोड मुलगा आहे. जेव्हा इरा नैराश्याशी झुंज देत होती, तेव्हा तो तिच्यासोबत होता. त्याने इराला भावनिक आधार दिला. तिने असा माणूस निवडला याचा मला आनंद आहे... ते एकत्र खूप आनंदात असतात आणि एकमेकांची काळजी घेतात." अशाप्रकारे आमिरची लेक इरा पुढच्या वर्षी 3 जानेवारीला लग्न करणार आहे.

मुलगी सासरी जाण्याच्या कल्पनेने आमिर भावूक

आमिरचं मुलीच्या लग्नात भावूक होणार का असे विचारल्यावर तो म्हणाला, “मी खूप इमोशनल माणूस आहे. जेव्हा इरा सासरी जाईल त्या दिवशी मला खूप रडू येणार हे निश्चित आहे. मी खूप भावूक असल्यामुळे इराच्या बिदाईच्या वेळी आमिरला सावरावे लागेल अशी चर्चा कुटुंबात सुरू झाली आहे. मला माझे अश्रू आणि हसू आवरता येत नाही.

आमिर खानची मुलगी इराबद्दल थोडंसं...

इराचा बॉयफ्रेंड नुपूर हा एक फिटनेस ट्रेनर आहे. फिटनेस एक्स्पर्ट आणि कंन्सलटंट म्हणुन तो काम करतो. बऱ्याच वर्षांपासून तो आयराचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम पाहत होता. त्याने केवळ आयराचं नव्हे तर सुष्मिता सेन आणि आमिर खानला देखील फिटनेसचे धडे दिले आहे. तर  इरानं 2019 मध्ये दिग्दर्शनात पदार्पण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT