Aamir Khan speaks fluent marathi Instagram
मनोरंजन

मराठी माणसाला लाजवणारं आमिरच बोलणं ऐकलंय? व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओतील आमिरचं अस्खलित मराठी ऐकून त्याचा मराठमोळा चाहता मात्र सुखावलेला दिसत आहे.

प्रणाली मोरे

आमिर खान(Aamir Khan) हा बॉलीवूडचा(Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. तो सलग सिनेमे केव्हाच करताना दिसत नाही. पण गेल्या काही वर्षात असं खूप कमी वेळा झालंय की आमिरनं सिनेमा केला अन् तो चाललाच नाही. 'तारे जमीन पे',' दंगल','थ्री इडियट्स','गझनी','लगान','दिल चाहता है' या त्याच्या सिनेमांनी तर रेकॉर्ड केलेयत. हो आता त्यापैकी 'ठग ऑफ हिंदुस्तान' वगैरे त्यानं केलेले सिनेमे काही अपवाद ठरलेयत त्याला. पण असो,शेवटी माणूस कधीतरी चुका होणारच. आमिरचे सिनेमे म्हणजे कथा अन् अभिनय यांची दुहेरी मेजवानी असते. आमिर खुप टॅलेंटेड नट आहे. तो केवळ अभिनय क्षेत्रात नाही तर सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहे हे देखील आता सर्वप्रचलित आहे. त्याची पाणी फाऊंडेशन मोहिम हा त्याचाच एक भाग.

या आमिरच्या चळवळीच्या निमित्तानं तो महाराष्ट्रातील अनेक गावांमधनं फिरला आहे. तेथील लोकांना भेटून,त्यांच्या समस्या जाणून त्यानं घेतल्यात. त्याचं हे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेलं काम जोरात सुरु आहे. यानिमित्तानं एका दुसऱ्या सामाजिक मोहिमेची संकल्पना घेऊन काही सामाजिक कार्यकर्तेआमिरच्या सहकार्यासाठी त्याच्याकडे आले होते. ज्यांनी मुंबईत चिमण्यांचं प्रमाण कमी होत आहे त्याविषयी ते जे मोहिम राबवणार आहेत त्याची माहिती अस्खलित मराठीत आमिरला दिली. आमिर देखील इतकं भराभर तो माणूस बोलत होता तरी व्यवस्थित ते ऐकत होता. आणि त्या समोरच्या व्यक्तिला त्यानं मराठीतच उत्तर दिलं. आमिर म्हणाला,''मी फोन करतो तुम्हाला....'' हे एकच वाक्य आमिर इतक्या सहज आणि शुद्ध मराठी भाषेत बोलला की कुठेच त्याच्या बोलण्यात त्याचा अमराठीपणा जाणवला नाही. हा व्हिडीओ जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला तसं यावर मराठी नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना आमिरवर कौतूकाचा वर्षाव केला.

आमिर खान बरेच दिवस मोठ्या पडद्यापासून लांब होता पण आता त्याचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येत आहे. यात आमिरसोबत करिना कपूरही आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे पहिल्यांदा सिनेमाचं शूटिंग लांबणीवर पडलं,नंतर पोस्टप्रोडक्शनचं काम आणि प्रदर्शन. पण अखेर आता 'लाल सिंग चड्ढा' हा आमिरचा सिनेमा अखेर ११ ऑगस्ट,२०२२ रोजी आपल्या भेटीस येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT