Aamir khan news  esakal
मनोरंजन

Aamir Khan : 'जेवायला तर बोलावलं पण...' दीपिकानं सांगितला आमिरचा किस्सा!

आमिर खान हा त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेला अभिनेता आहे. सध्या आमिरच्या लाल सिंग (Aamir Khan) चढ्ढाची सोशल मीडियावर हवा आहे.

युगंधर ताजणे

Laal Singh Chaddha Movie: आमिर खान हा त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेला अभिनेता आहे. सध्या आमिरच्या लाल सिंग (Aamir Khan) चढ्ढाची सोशल मीडियावर हवा आहे. त्याच्याविरोधात मोठं कॅम्पेन देखील सुरु आहे. नेटकऱ्यांनी आमिर आणि त्याची येणारी फिल्म यावर टीका केली आहे. त्या चित्रपटावर बहिष्कार टाकावा. अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. यात (Bollywood News) केवळ आमिरच नाहीतर अक्षय कुमारच्या रक्षाबंधन आणि आता आलिया भट्टच्या डार्लिंग चित्रपटावर देखील नेटकऱ्यांनी सडकून टीका केली (Bollywood Director) आहे. या सेलिब्रेटींनी केलेली विधानं, त्यांच्या पोस्ट यावरुन अशा प्रकारचे पाऊल उचलले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणनं आमिरचा एक किस्सा शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं आपल्याला आमिरनं एकदा जेवायला बोलावलं होतं. मात्र त्यावेळी जे झालं त्याविषयी दीपिकानं सांगितलेला तो प्रसंग नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. दीपिका ही जेव्हा 13 वर्षांची होती तेव्हा आमिरच्या घरी गेली होती. दीपिकानं सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. तो फोटो शेयर करताना तिनं एक गंमतीदार किस्साही सांगितला आहे. बॉलीवूडमध्ये आजच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या दीपिकाच्या बाबत घडलेला तो प्रसंग ऐकून अनेकांना नवल वाटले आहे.

deepika padukone news

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंमध्ये दीपिका, आमिर खान दिसत आहे. अनेकांना दीपिका ओळखूही येणार नाही. 1 जानेवारी 2000 सालचा तो फोटो आहे. दीपिका म्हणते, त्यावेळी आमिरच्या घरी लंच सुरु होता. सगळेजण दही भात खात होते. आपण नेहमीच तिथे असायचो. असं ती सांगते. मात्र त्यावेळी आम्हाला आमिरनं ना जेवायला या असं म्हणून बोलला की आम्हीही त्याच्याकडे कोणतीही मागणी केली नाही.

दीपिकानं जो फोटो शेयर केला आहे त्यामध्ये ती, तिचे वडिल प्रकाश पदुकोण, तिची आई, बहिण अनिषा पदुकोण दिसत आहे. दीपिकाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाल्यास, ती ब्रम्हास्त्रमध्ये दिसणार आहे. तर आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा जोरदार चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. लाल सिंग चढ्ढा हा हॉलीवूडचा फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. त्यात अभिनेत्री करिना कपूर आणि मोना सिंग देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

SCROLL FOR NEXT