Laal Singh Chaddha Box office Collection News Laal Singh Chaddha Box office Collection News
मनोरंजन

Aamir Khan : सात दिवसांच्या प्रचंड संघर्षानंतर आमिरसाठी आली आनंदाची बातमी

लाल सिंह चड्ढा ७५ कोटींपर्यंत व्यवसाय करू शकेल असा अंदाज आहे

सकाळ डिजिटल टीम

Laal Singh Chaddha Box office Collection News २०२२ मध्ये आमिर खानने चार वर्षांनी पुनरागमन केले. मात्र, आमिरच्या लाल सिंग चड्ढाला बहिष्काराचा सामना करावा लागला. आमिरच्या (Aamir Khan) चित्रपटाविरोधात नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. या सगळ्या गोष्टींमधून पुढे गेल्यावर लाल सिंग चड्ढा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि समीक्षकांनी चांगले रिव्ह्यू दिले. मात्र, लाल सिंग चड्ढाने निर्मात्यासह चाहत्यांना चांगलेच निराशा केले.

आमिर खानच्या चित्रपटाचा सात दिवसांचा व्यवसाय निराशाजनक आहे. पहिल्या दिवसापासून आमिर खानचा (Aamir Khan) चित्रपट अपेक्षेपेक्षा कमी कमाई करत आहे. हे चक्र आजतागायत सुरू आहे. चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस कमी होत आहे. रक्षाबंधन आणि १५ ऑगस्टच्या सणामुळे चित्रपटाला ५ दिवसांचा सुट्टीचा वीकेंड मिळाला. परंतु, एका दिवसातही चित्रपट कमाईतील तोटा भरून काढू शकला नाही. सुट्ट्या संपल्यानंतर सहाव्या आणि सातव्या दिवशी चित्रपटाची कमाई खराब झाली.

मंगळवारी सहाव्या दिवशी या चित्रपटाच्या (Movie) कमाईने धक्का दिला. चित्रपटाने केवळ दोन कोटींची कमाई केली. बुधवारी लाल सिंह चड्ढाची कमाई काही विशेष झाली नाही. सात दिवसांच्या प्रचंड संघर्षानंतर चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा गाठला आहे. अशा परिस्थितीत ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणे ही आमिरच्या चित्रपटासाठी कमी जादूची गोष्ट नाही.

११ ऑगस्टला प्रदर्शित झालेला लाल सिंह चड्ढा हा चित्रपट दुसऱ्या वीकेंडपर्यंत ५३-५४ कोटींचा व्यवसाय करू शकेल. त्याचवेळी चित्रपट फक्त ७५ कोटींपर्यंत व्यवसाय करू शकेल असा अंदाज आहे. आमिरच्या चित्रपटाबाबत काढलेला हा अंदाज कितपत खरा ठरतो, हे येणाऱ्या काळातच कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

भारतीय संगीतकारांनी केलेली मोठी चूक ! भरपाई म्हणून ऑफर केलं पाकिस्तानी गायिकेला गाणं; आजही आहे सुपरहिट

Theur Crime : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वर्गातीलच अल्पवयीन मित्राकडून वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यावर प्रकार आला उघडकीस

Latest Marathi News Updates : वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला स्थगिती देण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १५ सप्टेंबर रोजी अंतरिम आदेश देणार

India vs Pakistan Asia Cup : 'आशिया कप'मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणे भारताची मजबूरी का आहे? माजी क्रीडामंत्र्यांनीच सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT