AAMIR khan 
मनोरंजन

आमीर खानच्या आईचा कोरोना रिपोर्ट आला समोर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई-अभिनेता आमीर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला होता. याची माहिती स्वतः आमीरने त्याच्या सोशल साईट्सवरुन दिली होती. आमीरच्या घरातील एकुण ७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आमीरच्या घरातल्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. जवळपास सगळ्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याचं आमीरने सांगितल होतं. केवळ त्याच्या आईचाच रिपोर्ट येणं बाकी होतं. इतकंच नाही तर माझ्या आईच्या टेस्टसाठी प्रार्थना करण्याचीही त्याने विनंती केली होती. अखेर आज आमीरच्या आईचा कोविड-१९ टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे.

अभिनेता आमीर खानने त्याच्या सोशल साईटवरुन आईचा रिपोर्ट आल्याची माहिती दिली आहे. आमिरने म्हटलंय, सगळ्यांना नमस्कार, माझ्या आईची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेसाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद.

आमीर खानने मंगळवारी एक पत्रक सोशल मिडियावर शेअर करत त्याच्या घरात काही कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

आमीरने लिहिल होतं की, 'माझ्या घरातील काही कर्मचा-यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. याची माहिती मिळताच बीएमसीने त्यांना लगेचच क्वारंटाईन केलं आहे. तसंच त्यांची योग्य ती काळजी घेत लवकरात लवकरत त्यांना चांगली सुविधा दिल्याने मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी लगेचच सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचवत इमारतीचं देखील निर्जंतुकीकरण केलंय. आम्ही घरातील सर्व सदस्यांनी कोरोना टेस्ट केली आहे.आणि आमच्या सगळ्यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. आता केवळ माझ्या आईची टेस्ट बाकी आहे. ती करायला आता मी जात आहे. ती एकटीच टेस्ट करायची बाकी आहे. माझ्या आईची टेस्ट देखील निगेटीव्ह येईल यासाठी प्रार्थना करा.' 

आमीरच्या आईची कोविड-१९ टेस्ट निगेटीव्ह आल्याने त्याचा जीव खरोखरंच भांड्यात पडला आहे. कोरोना व्हायरस वयस्कर आणि वृद्ध लोकांना तसंच लहान मुलांना त्यांच्या कमी असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील वृद्ध व्यक्तींची जास्त काळजी घेण्याची गरज आहे.   

aamir khan mother test negative for coronavirus  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT