Amir Khan Poster were burnt by the Hindu Organization, Threatened Instagram
मनोरंजन

आमिर खानला मिळाली धमकी; हिंदू संघटनेनं जाळले फोटो,काय घडलं नेमकं?

आमिर खान सध्या त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमामुळे चर्चेत होताच पण आता त्याला मिळालेल्या धमकीनं चाहते मात्र चिंतेत पडलेयत.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा(Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा'(Lal SIngh Chaddha) सिनेमा ११ ऑगस्ट २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत करिना कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पहात आहेत. हा सिनेमा याआधी २०२१ रोजी नाताळच्या दरम्यान प्रदर्शित होणार होता. त्यानंतर २०२२ मध्ये बैसाखीच्या मुहूर्तावर सिनेमानं तारीख निश्चित केली होती. आता हा सिनेमा ऑगस्ट २०२२ मध्ये अखेर भेटीस येत आहे. पण आता या सिनेमाला विरोध करण्यात येत आहे. यूपीच्या सुल्तानपूर मध्ये काही लोकांनी आमिर खान आणि त्याच्या सिनेमाविरोधात निदर्शनं करायला सुरुवात केली आहे. अभिनेत्याचे पोस्टर फाडण्यासोबतच त्यांना जाळण्याचा देखील प्रयत्न केला गेला आहे.

people performing protest agaisnt Aamir Khan

सुल्तानपूरच्या विजेथुआ खाममध्ये हिंदूत्ववादी संघटनेने हा विरोध दर्शविलेला आहे. २९ मे,ज्या दिवशी आयपीएल चा फिनाले आहे,त्या दिवशी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे,यादिवशी देखील विरोध करण्यासाठी जोरदार निदर्शनं करण्यात येणार असल्याचं कळत आहे. सनातन रक्षक सेनाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल सिंग यांचं म्हणणं आहे की,''आमिर खानला IPL फिनालेमध्ये बोलावण्यात आलं आहे. आमिर नेहमी भारताची संस्कृती आणि सभ्यते विरोधात बोलतो. हा तोच आमिर खान आहे,जो हिजाबच्या समर्थनार्थ उभा राहिला होता. याची स्वतःची मुलगी फेसबूक आणि गुगल वर जे फोटोपोस्ट शेअर करते ज्याची माहिती यालाही असते. तरीदेखील यावर त्याचा आक्षेप नाही''.

राहुल सिंग पुढे म्हणाले,''एवढंच नाही,याच्या पूर्वाश्रमीच्या बायकोला देखील भारतात असुरक्षित वाटत होतं. अशा लोकांना आपली IPL मॅनेजमेंट कसं निमंत्रण देते? यावर आम्हा सगळ्या सनातनी लोकांचा आक्षेप आहे. आमिर खानचं निमंत्रण रद्द करायला हवं. आणि जर तसं झालं नाही तर आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचू. तिथे आंदोलन करू. तसंही सनातन रक्षक सेना अनेक जिल्ह्यात आमिर खान विरोधात प्रदर्शन करीत आहे''.

आमिर खानचे चाहते मात्र लाल सिंग चड्ढा सिनेमाची वाट पाहत आहेत. आमिरचा एका वर्षात फक्त एक सिनेमा प्रदर्शित होतो आणि तो सुपरहिट देखील होतो. आता हे खरंय की गेल्या काही वर्षांपासून आमिर खान मोठ्या पडद्यापासून लांब राहिलाय. पण आता चर्चा मात्र रंगलीय की आमिरचा लाल सिंग चड्ढा त्याच्या करिअरमधला मोठा सिनेमा म्हणून ओळखला जाऊ शकतो. या सिनेमातल्या कहानी गाण्याला खूप पसंती मिळाली. सिनेमाचं दिग्दर्शन अद्वैत चंदनने केलं आहे,आमिरचा सीक्रेट सुरस्टार त्यानंच दिग्दर्शित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT