Aamir Khan reveals his food habit says ask Shahrukh Khan he knows very well
Aamir Khan reveals his food habit says ask Shahrukh Khan he knows very well  
मनोरंजन

आमीर खान सांगतो, 'ही' गोष्ट असते नेहमी सोबत... (व्हिडीओ)

सकाळवृत्तसेवा

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमीर खान याने आपण जिथे जातो तिथे स्वतःचा टिफीन घेऊन जातो, असा खुलासा नुकताच केला आहे. डाएट वर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन आमीर च्या हस्ते झाले. या प्रकाशन कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्नांना आमीरने मजेशीर उत्तरे दिलीत.

'दंगल' चित्रपटांच्या चित्रकरणाच्या काळात आमीरने सोशल मिडीयावर आपल्या वर्कआउटचे अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले. यावरुन तो फिटनेसच्या बाबतीत किती काळजी घेतो हे दिसून आले. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात एका पत्रकाराने मोठमोठ्या पार्टीमध्ये जातो तेव्हा तेथील जेवण जेवतो का? असे विचारल्यावर आमीर म्हणाला, 'मी माझ्या जेवणाचा डबा सगळीकडे घेऊन जातो. खरंच. हवं तर शाहरुख खानला माझ्या या सवयीचा चांगलाच अनुभव आहे, तो तुम्हाला याबद्दल व्यवस्थित किस्से सांगेल. एकदा टीम कुक शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी आले होते. तेव्हा शाहरुखने मला सुध्दा आमंत्रित केलं होतं. गौरीने सगळ्यांना जेवायला बोलावले आणि आम्ही सगळे जेवायला बसलो. तेव्हा मी तिला माझा डबा सोबत आणल्याचं सांगितलं. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. शाहरुखने माझ्याकडे सगळे जेवायला बसले असताना तुला काय डब्बा खायला सुचतोय, असंही म्हटलं. पण मी माझ्या डाएट खूप गंभीरपणे पाळतो, असं सांगून मी माझ्या डब्यातलंच जेवण जेवलो.' 

सध्या आमीर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट हॉलिवूडपट 'फॉरेन गम्प'चा अधिकृत रिमेक असणार आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT