Aamir Khan s Hindi movie Laal Singh Chaddha motion poster released
Aamir Khan s Hindi movie Laal Singh Chaddha motion poster released 
मनोरंजन

#LaalSinghChaddha मिस्टर परफेक्शनिस्ट पुन्हा येतोय! 'लाल सिंग चढ्ढा'ला घेऊन!

सकाळ डिजिटल टीम

बऱ्याच काळ कुठेच न दिसलेला मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान परत येतोय! 'सिक्रेट सुपरस्टार' आणि 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'नंतर आमीर कुठे दिसलाच नाही. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेला आमीर आता पुढे कोणती कलाकृती सादर करणार याकडे आमीरच्या चाहत्यांचे डोळे लागले होते, अन् प्रतिक्षा संपली... आमीरने त्याच्या ट्विटरवर त्याच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च केले आहे.

आमीरच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर 'लाल सिंग चढ्ढा' हे नाव वारंवार येत होते. मात्र आज आमीरने 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाचे मोशन पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. आकाशी रंगाच्या या मोशन पोस्टरमध्ये एक पांढऱ्या रंगाचे पीस उडत आहे व 'आमीर खान - लाल सिंग चढ्ढाच्या भूमिकेत' असे लिहिले आहे. आमीरने या पोस्टरला 'क्या पता हम में है कहानी, या है कहानी में हम' असे कॅप्शन दिले आहे. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. तसेच या चित्रपटात आमीरसोबत करीना कपूर दिसेल अशी चर्चा आहे. अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शन करेल.


आमीरने 'लाल सिंग चढ्ढा'च्या कथानकाबाबत किंवा त्याच्या भूमिकेबाबत आतापर्यंत काहीच उघड केले नाही, पण हॉलीवूड चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटावरून घेतला आहे, अशी चर्चा आहे. आमीरने या चित्रपटासाठी 20 किलो वजन कमी केले आहे. या आमीर एका तरूणाची भूमिका साकारतच असल्याने त्याला तसे दिसणे गरजेचे होते, त्यामुळे त्याने डाएटवर भर दिलाय.    

मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून #LaalSinghChaddha आणि #AamirKhan हे हॅशटॅग ट्रेंडिंग आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT