Aamir Khan Secret Love Affairs..check Out ... Instagram
मनोरंजन

Aamir Khan Secret Affairs: विवाहित असूनही अनेकदा प्रेमात पडलाय आमिर...सीक्रेट अफेअर्सची मोठी यादी

आमिर खानच्या सबंध करिअरमध्ये त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं अन् त्यामुळे अनेकदा तो वादग्रस्त चर्चेतही आलेला दिसला.

प्रणाली मोरे

Aamir Khan Affairs: बॉलीवू़डचा परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानकडे पाहिलं जातं. आमिरनं आपल्या संपूर्ण फिल्मी कारकिर्दित वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आणि त्याच्या जवळपास सर्वच भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरल्या. अर्थात लाल सिंग चड्ढा सिनेमातील त्याची ड्रीम व्यक्तिरेखा त्याला अपवाद ठरेल. कारण या सिनेमाला लोकांनी ट्रोल तर केलंच शिवाय बॉक्सऑफिसवर सिनेमा दणकून आपटला. अन् आमिरचं मोठं नुकसान झालं. (Aamir Khan Secret Love Affairs..check Out ...)

आमिरचं सर्वात वाईट ट्रोलिंग म्हणजे सध्या वयाच्या साठीकडे आले असताना त्याचं नाव तिशीतल्या फातिमा सना शेख या अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. आता फातिमा काही पहिलीच अशी अभिनेत्री नाही,जिच्यासोबत आमिरचं नाव जोडलं गेलंय. अशा अनेक टॉपच्या अभिनेत्री आहेत ज्यांच्यासोबत आमिरचं सूत जुळल्याची चर्चा त्याचं लग्न झालेलं असताना सुद्धा रंगली होती. चला,आज जाणून घेऊया आमिरच्या अशाच काही सीक्रेट्स अफेअर्सविषयी...

Aamir Khan Secret Love Affairs..check Out ...

रीना दत्ता

तुम्हाला माहितीय का रीना दत्ता म्हणजे आमिरची पहिली पत्नी ही त्याच्या शेजारीच रहायची. तिनं सुरुवातीला आमिरच्या प्रेमाला स्पष्ट नकार दर्शवला होता. पण दोघांची लव्हस्टोरी सुरु अखेर सुरु झाली ती ८० च्या दशकात...आणि दोघांनी लग्न केलं ते १९८६ साली अगदी कोवळ्या वयात. आमिर आणि रीनाला आयरा खान आणि जुनैद खान अशी दोन मुलं आहेत. २००२ मध्ये आमिरनं रीना दत्ताला घटस्फोट दिला. त्यानंतर कोर्टानं दोन्ही मुलांची कस्टडी ही आई रीना दत्ताकडे सोपवली. हे आमिरचं पहिलं सीक्रेट अफेअर...

Aamir Khan Secret Love Affairs..check Out ...

पूजा भट्ट

आमिर खानच्या सीक्रेट अफेअरमध्ये अभिनेत्री पूजा भट्टचे नाव देखील सामिल आहे. कसं काय आपण विसरू शकतो त्या दोघांचा 'दिल है की मानता नही हा सिनेमा'. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच म्हणे पूजा आणि आमिरमध्ये प्रेमाचं नात उमलू लागलं. अर्थात,दोघांनीही उघडपणे कधीच आपल्यातील नात्यावर त्यावेळी भाष्य केलं नाही. आणि त्यांच्यातील वैचारिक मतभेदांमुळे नंतर त्यांनी आपले मार्ग बदलले.

Aamir Khan Secret Love Affairs..check Out ...

Jessica Hines

आमिर खान 'गुलाम'च्या सेटवर म्हणे एका ब्रिटिश पत्रकार असलेल्या महिलेच्या प्रेमात पडला होता,जिचं नाव होतं जेसिका हिन्स.आमिर खानची तिच्याशी ओळख 'गुलाम'च्याच एका इव्हेंटमध्ये झाली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. नंतर बोललं जातं की 'गुलाम'च्या शूटिंग दरम्यान आमिर आणि जेसिका लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये देखील राहत होते.

Aamir Khan Secret Love Affairs..check Out ...

प्रीती झिंटा

'दिल चाहता है..' हा सिनेमा आणि त्यातील आमिर-प्रीतीची जोडी आपण कसं काय विसरू शकतो? तेव्हा अफवा होती की प्रीतीच्या प्रेमात आमिर आकंठ बुडाला आहे. बोललं जातं की आमिरच पहिलं लग्न जेव्हा तुटण्याच्या मार्गावर होतं तेव्हा तो प्रीती लाच डेट करत होता. रीना दत्तापासून विभक्त झाल्यावर तेव्हा जोरदार अफवा पसरली होती की आमिर लवकरच प्रीती झिंटासोबत लग्न करत आहे. आणि तेव्हा प्रीतीमुळेच आमिरचा घटस्फोट झाला असं देखील म्हटलं गेलं होतं.पण त्यानंतर काही वर्षांनी प्रीती झिंटाने स्वतः यावर स्पष्टिकरण दिलं होतं की ही सगळी अफवा होती आणि आमिर तिचा फक्त मित्र आहे असं देखील तिनं म्हटलं होतं.

Aamir Khan Secret Love Affairs..check Out ...

किरण राव

आमिरचा रिना दत्तासोबत घटस्फोट झाल्यानंतर तीन वर्षांनी त्याने किरण रावसोबत लग्नगाठ बांधली ती २८ डिसेंबर,२००५ रोजी. किरण रावनं 'लगान'साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. किरण आणि आमिरनं त्यांच्या लग्नाच्या ६ वर्षांनी आपला मुलगा आझाद राव खान याच्या जन्माची घोषणा केली. आझाद राव खानचा जन्म हा ५ डिसेंबर,२०११ रोजी झाला आहे. आणि नुकतंच आमिर आणि किरणने त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली,जिला ऐकून त्यांचे सगळेच चाहते हैराण झाले होते. आपण दोघांनी घटस्फोटाचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे आणि यापुढे आपण चांगले मित्र बनून राहू असं देखील ते म्हणाले होते.

Aamir Khan Secret Love Affairs..check Out ...

फातिमा सना शेख

२०१६ मध्ये एका अफवेनं डोकं वर काढलं ती म्हणजे आमिर खान त्याची सह-कलाकार फातिमा सना शेखला डेट करत आहे. दोघं अनेक कार्यक्रमातून एकत्र दिसल्यानं या अफवेनं आणखी जोर धरला. आणि हळूहळू हे प्रकरण किरण राव पर्यंत पोहोचलं आणि शेवटी आमिर-किरणचा घटस्फोट झाला असं देखील म्हटलं जात आहे. फातिमा आणि आमिरमधील सीक्रेट अफेअरमुळेच त्याचा दुसरा घटस्फोट झाला असं देखील म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT