Aamir Khan shared Laal singh Chaddha next poster with Kareena Kapoor 
मनोरंजन

आमिरने करीनाला 'व्हॅलेंटाईन डे' विश केलं आणि म्हणला....

वृत्तसंस्था

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अनेक ठिकणी तो वेगवेगळ्या लूकमध्ये पोहोचतो आणि लोकांना भेटतो. त्याच्या प्रमोशनच्या या हटके स्टाईलमुळेच तो चाहत्यांची मनं जिंकतो. अशातच त्याने 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त लाल सिंग चढ्ढाचं पुढचं पोस्टर शेअर केलंय. यात त्याच्यासह त्याची हिरोईनही आहे...

लाल सिंग चढ्ढाच्या या पोस्टरमध्ये आमीर खान मागून दिसतोय. समोरून त्याला करीनाने मिठी मारली आहे. या चित्रपटात करीना त्याची मुख्य नायिका असेल. या फोटोला त्याने 'पा लेने की बेचैनी, और खो देने का डर... बस इतना सा है, ज़िंदगी का सफर।' असं कप्शन दिलंय. तर मजेशीर गोष्ट म्हणजे त्याने करीनाला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्यात व 'तुझ्यासोबत प्रत्येक चित्रपटात रोमान्स करायची संधी मिळो' असंही लिहलंय.

आमीरने 'लाल सिंग चढ्ढा'च्या कथानकाबाबत किंवा त्याच्या भूमिकेबाबत आतापर्यंत काहीच उघड केले नाही, पण हॉलीवूड चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटावरून घेतला आहे, अशी चर्चा आहे. आमीरने या चित्रपटासाठी 20 किलो वजन कमी केले आहे. यात आमीर एका तरूणाची भूमिका साकारतच असल्याने त्याला तसे दिसणे गरजेचे होते, त्यामुळे त्याने डाएटवर भर दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: पडिक्कलची चार सामन्यात तिसरी सेंच्युरी; सर्फराज खान-ऋतुराज गायकवाडचीही वादळी शतके; टीम इंडियात कोणाला संधी?

Pimpalwandi Leopard News : पिंपळवंडीत बिबट्याचा थरार संपला! थर्मल ड्रोनच्या निगराणीनंतर अखेर 'सहा वर्षांचा' बिबट्या पिंजऱ्यात कैद

New IPO : IPO अलर्ट! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! वर्षातील अखेरचा IPO आजपासून सुरू; जाणून घ्या प्राइस रेंज, GMP आणि डिटेल्स

Navi Mumbai Airport: विमानसेवा सुरू, नेटवर्क गायब! नवी मुंबई विमानतळाची दूरसंचार कंपन्यांवर दरवाढ

मी चुकले! या विषयावर बोलण्याचा मला अधिकार नाहीये... जितेंद्र जोशीच्या पत्नीने मागितली माफी; कारण...

SCROLL FOR NEXT