Darshil Safary Latest News esakal
मनोरंजन

Aamir Khan Darshil Safary Come Back : 'तारे जमीन पर' मधला 'ईशान' तब्बल सोळा वर्षानंतर पुन्हा दिसणार आमिरसोबत!

आमिरच्या आगामी (Aamir Khan Darshil Safary Come Back) सितारे जमीन पर नावाच्या प्रोजेक्टमध्ये दर्शिल सफारी दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

युगंधर ताजणे

Aamir Khan Sitaare Zameen Par Movie Darshil Safary : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्टचा तारे जमीन पर ज्यांनी पाहिला असेल त्यांना दर्शिल सफारी कोण हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्या (Darshil Safary news) चित्रपटामध्ये त्यानं ईशान अवस्थी नावाच्या मुलाची भूमिका केली होती. आता तब्बल १६ वर्षानंतर आमिरच्या एका चित्रपटातून दर्शिलची कमबॅक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दर्शिलनं त्याच्या इंस्टा अकाउंटवरुन एक खास पोस्ट शेयर केली आहे. (Sitaare Zameen Par News) त्यामध्ये त्यानं आमिर खानसोबतचा फोटो पोस्च करत तारे जमीन पर मधला त्याचा आणि आमिरचा लूक याविषयी चाहत्यांना सांगितलं आहे. १६ वर्षानंतर दर्शिल पुन्हा आमिरच्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे अशी बातमी समोर येताच चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आलं आहे. २००७ मध्ये आलेल्या तारे जमीन पर नावाच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

त्या चित्रपटामध्ये आमिर खाननं निकुंभ नावाच्या शिक्षकाची भूमिका करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाईही केली होती. खास करुन आमिर आणि दर्शिल सफारीच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंत केले होते.

आमिरनं यापूर्वी त्याच्या सितारे जमीन पर नावाच्या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याचा हा चित्रपट येत्या वर्षातील ख्रिसमसला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यात दर्शिलनं आमिरसोबत शेयर केलेल्या एका फोटोमुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे.

आमिर आणि दर्शिलचा इंस्टावरील तो फोटो चर्चेचा विषय आहे. त्यात त्यानं एका तारे जमीन पर मधील सीन पोस्ट करत चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला आहे. त्या दोन्ही फोटोंमधील आमिर अन् दर्शिलचा लूक खास आहे. त्यानं कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मोठी धमाल आहे... १६ वर्षांनी आम्ही पुन्हा एकत्र येतो आहोत. हा खूपच मोठा रंजक अनुभव असणार आहे.

दर्शिलच्या त्या पोस्टवर त्याला चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझर्सनं कमेंट करत त्याला म्हटले आहे की, आम्ही तुला पुन्हा एकदा आमिर सोबत स्क्रिन शेयर करताना पाहण्यास उत्सुक आहोत. तुझ्या आगामी या प्रोजेक्टला खूप साऱ्या शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: भारत धर्मनिरपेक्ष! दिया मिर्झाचा डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा शेअर करा; हायकोर्टानं भाजपला फटकारलं

Madhya Pradesh News: पोलीस निरीक्षक दिलीप पुरी यांच्या कुटुंबीयांना १ कोटींची मदत; पत्नीला SI पदावर नोकरी

Banana Crop Loss,: पाण्याअभावी उभ्या केळीच्या बागेवर फिरविला ट्रॅक्टर; अडीच एकरांतील तीन हजार झाडे उद्ध्वस्त; साडेतीन ते चार लाखांचा खर्च मातीमोल

R. Ashwin: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियातील करिअर संपलं? अश्विनने सांगितलं मोठं कारण; मोहम्मद शमीच्या कमबॅकचे संकेत!

Latest Marathi News Live Update : सांगोल्यात भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

SCROLL FOR NEXT