Amir Khan News Esakal
मनोरंजन

Amir Khan News: बॉलिवूड पुन्हा टॉलिवूड चित्रपटाचा रिमेक करणार अन् त्यात आमिरचा लाडका लेक चमकणार!

सकाळ डिजिटल टीम

Amir Khan News: मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला आमिर खान आज लाखो फॅन्सच्या मनावर राज्य करत आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. मात्र आता बॉलिवूडच्या अभिनेत्यांचे स्टारकिड्सही बॉलिवुडमध्ये पदार्पण करत आहेत.

आपल्या आई वडिलांच्या पाउलावर पाउल ठेवुन तेही अभिनयात आपलं नशिब आजमावत आहे. असे अनेक किड्स आहेत मात्र काहीच जणांना इंडस्ट्रीत आपलं स्थान टिकवुन ठेवता आलं आहे.

आता त्यातच आमिर खानचा मुलगा जुनैद खान हा देखील सध्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सुपरहिट साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी जुनैद खानला साईन केल्याचे वृत्त आहे. (Entertainment News in Marathi)

'लव्ह टुडे' या तमिळ भाषेतील हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवला जात असून, या चित्रपटात आमिरचा मुलगा दिसणार असल्याच्या बातम्या आहेत.

फँटम फिल्म्स आणि सृष्टी आर्य या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा रिमेक बनवत आहेत, ज्यासाठी त्यांनी लिड अभिनेता आता फायनल केला आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खानचा मुलगा जुनैद खान या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये हिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र, चित्रपटाच्या कास्टिंगबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, जुनैदला चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आला आहे आणि तो लवकरच चित्रपटाचा फायनल अभिनेता होऊ शकतो.(Latest Marathi News)

तमिळ भाषेत बनलेल्या 'लव्ह टुडे'च्या कथेबद्दल सांगायचे तर, हा एक प्रेमकथा चित्रपट आहे, जो गेल्या वर्षी 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आजच्या जगाच्या प्रेमी जोडप्याच्या प्रेम कहानी भोवती फिरतो. (Marathi Tajya Batmya)

चित्रपटाचे बजेट पाच कोटी रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 150 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात साऊथचे सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप रंगनाथन आणि इवाना महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. त्याच वेळी प्रदीपने चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनही केले होते.

तर आमिर खानचा मुलगा जुनैदबद्दल सांगायचं झालं तर त्याने यापूर्वी यशराज बॅनरच्या 'महाराजा' चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. याशिवाय तो आमिर खान प्रॉडक्शन निर्मित 'प्रीतम प्यारे' या वेबसिरीजचाही भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT