javed hydar 
मनोरंजन

आमीर खानच्या 'या' सहकलाकारावर आली भाजी विकण्याची वेळ..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने संपूर्ण इंडस्ट्री ठप्प आहे. आता अनलॉकच्या निमित्ताने हळूहळू कामांना सुरुवात होताना दिसतेय. मात्र गेल्या तीन महिन्यात टीव्ही आणि सिनेइंडस्ट्रीमधील शूटींगसोबतंच अनेक कामं ठप्प होती. त्यामुळे अनेक कलाकार आणि टेक्निशिअन्स आर्थिक अडचणींमध्ये सापडले होते. पोट भरण्यासाठी काम करणं तर गरजेचं आहे. सामान्यांसोबतंच सिनेइंडस्ट्रीतील अनेकांना या परिस्थितीशी सामना करावा लागला आहे. आमीर खानच्या एका सहकलाकाराला देखील या दरम्यान इतर काही कलाकारांप्रमाणे पैसै कमवण्यासाठी भाजी विकण्याचा व्यवसाय करावा लागला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

आमीर खानच्या गुलाम सिनेमात काम केलेला अभिनेता जावेद हैदरवर ही परिस्थिती ओढवली आहे. घरखर्च चालवण्यासाठी तो भाजी विकत असलेला व्हिडिओ समोर आला आहे. जावेद हैदरने लाईफ हो तो ऐसी या सिनेमात देखील काम केलं आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटात स्वतःचं पोट भरण्यासाठी त्याला भाजी विकणं भाग आहे.

टीव्ही अभिनेत्री डॉली बिंद्राने जावेद हैदरचा हा व्हिडिओ तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलंय, 'हा एक अभिनेता आहे जो आजच्या तारखेला भाजी विकत आहे- जावेद हैदर त्यांचं नाव आहे. 'बिग बॉस फेम डॉली बिंद्राने पुढे लिहिलंय, 'लॉकडाऊनमुळे कित्येकांना काम मिळत नाहीये. जावेदने २००९ साली बाबर आणि टीव्ही सिरीज जीनी ऑर जुजु मध्ये देखील काम केलं आहे.'

टिकटॉवर हा व्हिडिओ स्वतः जावेद हैदरने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो भाजी विकतोय. आणि या व्हिडिओमध्ये हे गाणं वाजतंय- 'दुनिया मै रेहना है तो काम कर प्यारे, हात जोड सबको सलाम कर प्यारे, वर्ना ये दुनिया जीने नही देगी, खाने नहीद देगी, पीने नही देगी.' टिकटॉवरिल त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्याच्या संघर्षाला युजर्स सलाम करत आहेत.     

aamir khans co star javed hyder sells vegetables to earn livelihood amid lockdown  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT