Aamir Khan's Water Foundation has now gained global recognition 
मनोरंजन

आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनला मिळाली आता जागतिक ओळख

सकाळवृत्तसेवा

मुंबई : बॉलिवुड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी पाणी फाऊंडेशनची स्थापना केली. महाराष्ट्र राज्यातील अनेक गावे दुष्काळग्रस्त आहेत.अनेक तालुक्यात व गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे.

पाणी फाऊंडेशनने गावकऱ्यांना पाणलोट व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे, ज्याद्वारे गावकऱ्यांनी एक संयुक्त आघाडी उघडून संपूर्ण जलाशयात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी स्पिलवेची निर्मिती केली, ज्यामुळे गावचा पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक गावे दुष्काळमुक्त झाली.

वॉटर कप ही स्पर्धा प्रकल्प महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्यासाठी राबविण्यात आली होती.यामध्ये अनेक गावांनी आपला सहभाग नोंदविला. याच पाणी फाऊंडेशनचे कौतुकआंतरराष्ट्रीय ख्यातीचे डिझायनर, ओरेगॉन स्टेट विद्यापीठाचे प्राध्यापक अँड्र्यु मिलिसन यांनी केले आहे.

पाणलोट व्यवस्थापनावरील काम समजून घेण्यासाठी एंड्रयू यांनी महाराष्ट्रातील एका गावाला भेट दिली होती. पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावकऱ्यांनी केलेले काम पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि पृथ्वीवरील सर्वात मोठा फार्माकल्चर  प्रकल्प म्हणून त्यांनी याचा गौरव केला. त्यांनी त्यावर एक लघुपटही बनवला असून तो आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनला आता जागतिक पातळीवर ओळख मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT