Aanand L Rai Will Introduce Ansh Duggal: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल राय यांनी इंडस्ट्रीला 'रांझना' आणि 'तनु वेड्स मनू' सारखे हिट चित्रपट दिले आहेत. कलर यलो प्रॉडक्शनचा ते महत्वाचा भाग आहे. आता नुकतच या प्रोडक्शनने एका नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.
कलर यलो ने अभिनेता अंश दुग्गलला लाँच केलं आहे. अंश हा मनोरंजन विश्वासाठी ओळखीचा चेहरा आहे. तो प्रसिद्ध मॉडेल आहे. अंश दुग्गल अनेकदा मुंबईत तर कधी दिल्लीत मॉडेलिंग असाइनमेंटसाठी दिसतो. अंश दुग्गलला ग्लॅमरस इंडस्ट्रीत आपले करिअर करायचे आहे.
तसेच तो टॉप इमर्जिंग मॉडेल्सपैकी एक आहे. अंश दुग्गल काही काळापूर्वी डिझायनर मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक करताना दिसला होता.
यापुर्वी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लाडकी लेक खुशीसोबत अंश दिसला होता. त्यावेळी त्यांच्या खुप चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांचे व्हिडिओ खुप व्हायरल झाले होते.
आनंद एल राय ज्यांनी नेहमीच नव्या कलाकारांना प्रोत्साहन देत असतात. आता त्यांनी अंशची चित्रपट जगताशी ओळख करून दिली आहे. अंश दुग्गल कलर यलो प्रॉडक्शनसह अनेक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
याबद्दल बोलतांना आनंद एल राय म्हणतात " आम्ही नेहमीच नव्या कलाकारांना प्रोत्साहन देत असतो आणि अशातच अंशला लाँच करणार असून तो आमच्या नव्या प्रोजेक्टमध्ये आमच्यासोबत काम करणार आहे.
आनंद एल राय यांचे कलर यलो प्रॉडक्शन नेहमी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. शुभ मंगल सावधान, तनु वेड्स मनू, रांझणा यांसारखे चित्रपट त्यांनी केले असून अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट येणाऱ्या काळात रिलीज होणार आहेत.
आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनचे अनेक प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत. ज्यात " तेरे इश्क मे, फिर आयी हसीन दिलरुबा, झिम्मा २, आत्मपॅम्फलेट " हे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.